Breaking News

प्रशासन

कोट्यवधींचा गौण खनिज घोटाळा

सांगलीतील तासगाव तालुक्यात दगड खाण पट्ट्यामधून हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. स्टोन क्रशरच्या मालकांनी परवान्यापेक्षाही कित्येक पट जास्त गौण खनिजाचे अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचा सपाटा लावला आहे. प्रशासन मात्र गांधाराची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहे. यामुळे कुंपणच शेत खातयं की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.तालुक्यात एकूण 12 …

Read More »

अब्दुल सत्तारांमुळे वैताग : कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना कोटींचे ‘टार्गेट’?

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून त्यांच्या मतदार संघात अर्थात सिल्लोड येथे कृषी महोत्सव आयोजित केला आहे. पण, यासाठी अधिकाऱ्यांना 15 कोटींचे लक्ष दिले असल्याची माहिती आहे. महोत्सवासाठी संपूर्ण कृषी खाते जणू कृषिमंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचे चित्र आहे. राज्याच्या इतिहासात, आजवर असा अर्वाच्च भाषेत बोलणारा कृषीमंत्री कुणी झाला नसेल, असे वैतागलेले अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. सिल्लोडमध्ये शासकीय निधीतून घेतलेल्या कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल बुक …

Read More »

२६ लाखांचा अपहार : सरपंचासह ग्रामसेवकाला अटक

धुळे जिल्ह्यातील जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेले सरपंच व ग्रामसेवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ …

Read More »

नागरिक त्रस्त : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष कधी होणार स्थापन?

नागरिकांना गावातून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणे सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातील असा कोणताही स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन झालाच नाही. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक -जावक विभागातच नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत, ही बाब समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जानेवारी २०२० रोजी सरकार गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी …

Read More »

मंडळ अधिकारी निलंबित

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील गणेशनगरमधील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्याचे निलंबन झाले असले, तरी प्रशासन अवैध उत्खनन करणाऱ्या खडीक्रशरचालकांवर कारवाईस धजावणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मालेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे व जिल्हा गौण खनिज …

Read More »

‘पीडब्लूडी’मध्ये चार काेटींचा घाेटाळा ; कारवाई थंडबस्त्यात

रत्नागिरीच्या चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लूडी)लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. मात्र, यात अनेकांना अभय देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. प्रकरण काय आहे? ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन …

Read More »

खंडणीखोर दुरुगकरची हकालपट्टी कधी? : राज ठाकरे उद्या नागपुरात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली …

Read More »

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीस विधिमंडळात काय म्हणाले…

देशभरातील कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही राज्य सरकारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशी मागणी पुढे आली. मात्र,अधिवेशनाच्या विधिमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली असून ही योजना लागू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘जुनी पेन्शन योजना लागू …

Read More »

नागपूर : कामगार कल्याण मंडळात भ्रष्टाचार, बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कोट्यवधींची लूट

नागपूरच्या सावनेर तालुक्यातील परिसरातल्या 18 बोगस कामगारांच्या नावानं कामगार कल्याण मंडळाने निधी वाटप केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे एका मृत व्यक्तीच्या नावानं तब्बल 2 लाख 34 हजार रुपये लाटण्यात आले. कामगाराला जर या मंडळाशी संबधित कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कामगाराची मंडळाकडे नोंदणी असणं बंधनकारक आहे. मात्र ज्या कामगारांना लाभ देण्यात आले आहेत, त्यातील एकही कामगार नोंदणीकृत नसल्याचं …

Read More »

मृद व जलसंधारण विभागात 670 पदांसाठी भरती, मार्चमध्ये परीक्षा

मृद व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. ३१ डिसेंबरपूर्वी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार असून मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल. या भरती प्रक्रियेसाठीच्या निवड समितीला ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत होईल. परीक्षेचा कालावधी १५ …

Read More »