Breaking News

प्रशासन

20 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ताब्यात

पुण्यातील पवन मावळ भागातील शिवणे येथील महिला मंडल अधिकार्‍यासह एका सहकार्‍यास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी व्यक्ती संभाजी लोहोर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकरण काय आहे? यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली येथील जमिनीच्या 7 /12 उतार्‍यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी …

Read More »

औरंगाबादेत ४५ हजारांची लाच : विस्तार अधिकारी,ग्रामविकास अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सार्वजनिक शौचालय बांधकामाचे २ लाख १० हजारांचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी ४५ हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडूळ (ता. पैठण) ग्रामपंचायत कार्यालयात केली. पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा आडूळ बु ग्रामपंचायतीचे प्रशासक अशोक सूर्यभान घोडके (वय ३६) …

Read More »

रेती माफियांची पाठराखण : तहसीलदार निलंबित

गौण खनिज प्रकरणात गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आणि विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर राहण्यासोबतच वर्तणुकीबाबच्या तक्रारी असल्याने अमरावतीच्या धामणगाव रेल्वेचे तहसीलदार प्रदीप शेलार यांना निलंबीत करण्यात आले आहे. स्थानिक आमदार प्रताप अडसड यांनीही तक्रार नोंदविली होती.शेलार यांच्या निलंबनाचे आदेश शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यामार्फत ते आज, शेलार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. निलंबन पत्रातील …

Read More »

नागपूर ‘पीडब्लूडी’त भ्रष्टाचार : शासकीय वसाहत 70 जणांना दिली बेकायदेशीररित्या किरायाने

✍️मोहन कारेमोरे ‘पीडब्लूडी’चे घर शासकीय कर्मचाऱ्यांना न देता किरायाने दिल्याची बातमी ‘विश्व भारत’ न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता यात आणखी विश्व्सनीय माहिती मिळाली असून किरायाची घरे जवळपास 70 असल्याचे कळते. त्यामुळे यात पीडब्लूडी खात्यातील बढे अधिकारी संशयाच्या भवऱ्यात सापडले आहेत. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपुरात शासनाचा महसूल बुढविणारा प्रकार समोर आलाय. शासकीय निवास सरकारी कर्मचाऱ्यांना न देता …

Read More »

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जळक्‍या लाकडाने अधीक्षकाकडून मारहाण

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईक यांनी जळती लाकडे हातात घेऊन मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. अकोले तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये 3 डिसेंबर रोजी सकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांनी कचरा जमा करून पेटविला होता. मात्र काही कचरा शिल्लक होता. त्यामुळे मुले …

Read More »

प्रशासन रेतीत तल्लीन : जनसामान्य वाऱ्यावर, वृद्धाने सोडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव

शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन आणि त्यांची …

Read More »

250 कोटींचा निजामचा बंगला सील : जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

महाबळेश्वर येथील निझामांचा भाडेतत्वावरील 15 एकर 15 गुंठे भूखंड आणि त्यावरील वुडलाॅन हा अलिशान बंगला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाने सील करण्यात आला. तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करण्यात आली. मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. बाजार भावाप्रमाणे या मिळकतीची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या घरात आहे. यापूर्वी 1 …

Read More »

नागपूर ‘पीडब्लूडी’चा प्रताप : शासकीय वसाहत दिली किरायाने

✍️मोहन कारेमोरे ‘पीडब्लूडी’ विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. आता नागपुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होईल. मात्र,’पीडब्लूडी’ विभागाने बेकायदेशीर कृती केल्याची बाब उजेडात आली आहे. शासकीय निवास सरकारी कर्मचाऱ्यांना न देता खासगी लोकांना दिल्याची माहिती आहे. प्रकरण काय आहे? नागपुरातील पीडब्लूडीच्या विभाग क्रमांक एकच्या अंतर्गत रविनगर शासकीय रहिवासी वसाहत आहे. …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्याला पाच हजारांपर्यंत दंड

पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश केला आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’चे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »