जुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क आहे. तो मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने पेन्शन नाकारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक संघटितपणे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. तर, जुनी पेन्शन न दिल्यास शिंदे सरकारला 52 लाख मतांचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी अमरावतीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अमरावतीचा पुढाकार हाच इतर जिल्ह्यांसाठी आदर्श …
Read More »400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार …
Read More »क्रीडा स्पर्धेच्या नावावर तलाठी गायब : औरंगाबाद ‘महसूल’च्या कारभारामुळे जनता त्रस्त
✍️मोहन कारेमोरे महसूल आणि जनसामान्यांचे नाते आणखी घट्ट विणण्यासाठी राज्य सरकार अतोनात प्रयत्न करते. सामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी तलाठी ते तहसीलदार आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात महसूल विभागातर्फे क्रीडा स्पर्धा आहेत. यात औरंगाबाद, पैठण,कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तहसील मधील बरेच कर्मचारी सहभागी होतात. पण, काही तालुक्यातील तलाठी मागील 8-10 …
Read More »शिक्षण विभाग : पैशांशिवाय फाईल सरकेना, भाजप आमदारच हतबल
शिक्षण विभागात पैशांशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. कोणत्याही कामासाठी अधिकारी-कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप भाजपचे आमदार नागो गाणार यांनी केला. अशी प्रकरणे निदर्शनास आणून दिल्यास नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप गाणार यांनी केला.
Read More »महसूल अधिकारी अडकणार : नागपुरातील रेती घोटाळ्याची एसआयटी चौकशी
महानिर्मितीच्या कोल वॉशरीजमधील नाकारलेल्या कोळशाच्या विक्रीत गैरप्रकार झाल्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे नागपुरातील रेती घोटाळय़ाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणी आणि बढ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रेतीत गुंतलेल्या पोलीस अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदारांची चौकशी होऊ शकते. वॉशरीजच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणाच्या …
Read More »विचाराधीन : कोतवाल, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटलांच्या मानधनात होणार वाढ
राज्यात कोरोनाची लाट असताना अंगणवाडी सेविका, कोतवाल,पोलिस पाटलांनी जीव धोक्यात घालून प्रशासनाची मदत केली. मात्र गाव आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी शासन दरबारी उपेक्षित आहेत. शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटलांनी अनेकवेळा उपोषण, धरणे आंदोलने केली. पण, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, राज्य सरकार यावर गंभीर असून येत्या मार्च-एप्रिलपर्यंत निर्णय …
Read More »बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार : तपास करा – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी गठित केलेल्या तालुकास्तरीय समिती मार्फत विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. आवश्यक तेथे पोलिस दल व अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेवून सांघिकपणे काम करावे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची सुधारित यादी तयार करुन पुढील 15 …
Read More »गडचिरोलीतील रस्त्यांची कामे तातडीने करा : शिंदे-फडणवीसचे निर्देश, कारेमोरे यांच्या पाठपुराव्याला यश
कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणं शक्य होत नाही. तर खड्ड्यांसोबतच धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. यावर ‘विश्व भारत’ने बातमी प्रकाशित केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील …
Read More »‘पीडब्लूडी’तील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार : अशोक चव्हाण अडकणार?
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बढत्या-बदल्या, चुकीच्या पद्धतीने बदल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती, निकृष्ट दर्जाची कामे असतानाही ठेकेदारांनी बिले देणे, एकाच कामाचे दोन दोन प्रस्ताव तयार करणे अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे पेवच फुटलं असून असून विभागाचे प्रमुखच त्यात बुडाले आहेत. एवढेच नव्हे तर नांदेड हे या भ्रष्टाचाराचे आगार झाल्याचा खळबळजनक आरोप करीत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण …
Read More »‘पीडब्लूडी’चे प्रभाकर गभणे यांचा सत्कार
सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) वरिष्ठ लिपिक प्रभाकर गभणे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यातर्फे गभणे यांचा सत्कार करण्यात आला. गभणे हे माजी सैनिक असून त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read More »
विश्वभारत News Website