मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिझवावे लागते. विविध ठिकाणी विशेष करून मराठवाडा,विदर्भात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना …
Read More »सरपंच, उपसरपंच मानधनाविना
मुंबई : सरपंच, उपसरपंचांना मानधनासाठी करावी लागणारी भटकंती कायम आहे. त्यामुळे राज्यातील सरपंच, उपसरपंचांसाठी मानधन हे मृगजळ ठरले आहे. राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक गावातील सरपंच, उपसरपंचांमध्ये नाराजी आहे. सरपंच-उपसरपंचांचे मानधन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान संस्थेकडे सोपवली होती. यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना (डेटा ऑपरेटर) मानधनविषयक माहिती संकलनाची जबाबदारी देण्यात आली. हे संकलन दरमहा करायची अट घालण्यात आली. त्यासंदर्भातील माहिती कधी …
Read More »‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही …
Read More »चौकशी प्रलंबित, तरीही पदोन्नतीचा प्रस्ताव
– मोहन कारेमोरे मुंबई : जळगावच्या तत्कालीन एका तहसीलदाराविरोधात विभागीय चौकशी प्रलंबित असताना त्यांचा उपजिल्हाधिकारी पदोन्नतीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडून मागितला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागवला आहे, हे विशेष. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. त्यासंदर्भात गुप्ता …
Read More »काँग्रेसचे आमदार जाणार भाजपात! फडणवीस-चव्हाण यांची भेट
मोहन कारेमोरे मुंबई : सेनेपाठोपाठ आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी …
Read More »नाशिक, नगरमध्ये ढगफुटी! शेतीचे नुकसान
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा …
Read More »मंत्रीमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये? नाराजीची भीती
– मोहन कारेमोरे मुंबई : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण, विस्ताराला होणारा विलंब लक्षात घेता नाराजी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने …
Read More »पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन
औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …
Read More »आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता
नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …
Read More »*सिंचन घोटाळ्यात थातूरमातुर कारवाई* मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांचा आरोप
मुंबई : राज्यातील सिंचन गैरव्यवहारात थातूरमातुर कारवाईचे गाजर दाखविण्यात येत असून निव्वळ राजकारण सुरु आहे, असा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांनी केला आहे. तसेच यात ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती कारेमोरे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी करणारे पत्र कारेमोरे यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, …
Read More »
विश्वभारत News Website