Breaking News

ऑरेंजसिटी

देशावर लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध : आ. मुनगंटीवार    

देशावर लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध : आ. मुनगंटीवार     चंद्रपूर, 25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसारमाध्यांचे स्वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्पाप व्यक्तींना तुरूंगात डांबण्यात आले. यातील कित्येकांनी 19 महिन्यापर्यंत तुरूंगवास भोगला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास झाला. अशा आणीबाणी दिनाचा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर …

Read More »

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण   

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण    चंद्रपूर दि.25 जून : समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नागपूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्री, उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी …

Read More »

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने Ø लसीकरणासाठी प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचे निर्देश चंद्रपूर,दि. 25 जून : ‘कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना राज्य शासनाने सुरु केली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येतो. कोरोनाविरुध्दच्या लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचून कोरोनमुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा, अशा सुचना …

Read More »

चंद्रपूर शहरात १ जुलैपासून हत्तीरोग निर्मूलन , महानगरपालिकेच्या आरोग्य चमूला प्रशिक्षण

चंद्रपूर शहरात १ जुलैपासून हत्तीरोग निर्मूलन महानगरपालिकेच्या आरोग्य चमूला प्रशिक्षण चंद्रपूर, ता. २५ : हत्तीरोग निर्मूलनाकरीता सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी मनपाचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.   चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई …

Read More »

२९० जणांनी केली कोव्हीड चाचणी; सात पाॅझिटिव्ह , चंद्रपूर शहरात सात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह केवळ ७६ रुग्णसंख्या

२९० जणांनी केली कोव्हीड चाचणी; सात पाॅझिटिव्ह  चंद्रपूर शहरात सात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह केवळ ७६ रुग्णसंख्या चंद्रपूर, ता. २५ : महानगर पालिका हद्दीत मागील २४ तासांत २९० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यात सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ५९ रुग्ण गृहविलगीकरणात, ६ जण …

Read More »

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा, 12 प्रकरणे निकाली

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा, 12 प्रकरणे निकाली चंद्रपूर,दि. 25 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत …

Read More »

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द राज्यव्यापी ‘‘चक्काजाम आंदोलनात‘‘ ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे  – हंसराज अहीर* *हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन* चंद्रपूर:- राज्यातील शिवसेना-काॅेग्रेस-राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध नोंदविण्यास तसेच हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या न्यायोचित मागणीसाठी भाजपा व प्रदेश भाजपा ओबीसी …

Read More »

आणीबाणी ‘‘काळा दिवस’’ स्मरणार्थ शोभाताईंचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान

आणीबाणी ‘‘काळा दिवस’’ स्मरणार्थ शोभाताईंचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान चंद्रपूर:- माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जुन 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली व या कालावधीत दमनकारी नितीचा अवलंब करून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले या विरूध्द आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले, अत्याचार केले, अनन्वित छळ केला त्यामुळे भाजपाव्दारे दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशभरात सर्वत्र ‘‘काळा दिवस’’ म्हणुन पाळण्यात येतो. दि. 25 …

Read More »

 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी 

 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी राजुरा, वार्ताहर  –              शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे ठाकुरवार परिवारा कडून कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक माजी आमदार अँड. वामनराव चटप, संस्थाध्यक्ष डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, सचिव …

Read More »

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान महाराष्ट्रात डेल्टा प्लसची नेमकी काय स्थिती; राजेश टोपेंनी दिली माहिती डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं …

Read More »