Breaking News

ऑरेंजसिटी

तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने केला हल्ला

भद्रावती, जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन व शेतोपयोगी साहित्य आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ग्रामस्थांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन महिलांचा आणि एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. या तिन्ही घटना बुधवार, 19 मे रोजी भद्रावती तालुक्यातील आयधुनिर्माणी जंगल परिसर, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी दिवाण तलाव परिसर तसेच सावली तालुक्यातील मंगर मेंढा परिसरात घडल्या. या वेगवेगळ्या घटनांत रजनी भालेराव चिकराम (रा. घोटनिंबाळा), सीताबाई …

Read More »

परीक्षा शुल्क माफ करा, अन्यथा आंदोलन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इशारा

चंद्रपूर, विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा व महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, अन्यथा आभासी पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढले आहे. राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी लागू आहे. त्यामुळे पालकांच्या हाताला काम नाही. परिणामतः सर्वच घटकांतील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिकट स्थितीत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क …

Read More »

गत 24 तासात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 मृत्यू

Ø  आतापर्यंत 68,835 जणांची कोरोनावर मात, Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 8,373 चंद्रपूर, दि. 18 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 370 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 18 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि.19 मे ते 21मे  2021 रोजी चंद्रपूर  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 19 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन …

Read More »

बालकांची काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे न्याय हक्क व यथायोग्य संगोपन होणार चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे.  कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे  तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत, याची दक्षता जिल्हा …

Read More »

शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेती विषयक कोणतीही उणीव भासू देता कामा नये :  पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न चंद्रपूर,  :  शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे व खतांचा विहित वेळेत पुरवठा होईल, बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही तसेच शेतकऱ्यांना अधिकृत खते व बी-बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व …

Read More »

मनपाचे रुग्णालय ठरणार तिसऱ्या लाटेत रुग्णांसाठी ‘आसरा’ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

महानगरपालिकेच्या ‘आसरा’ कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण चंद्रपूर, : कोरोनाची दुसरी लाट ओसरली म्हणून बेसावध राहू नका. कारण तिसरी लाट तोंडावर आहे. येथे भरती होणारा रुग्ण बरे होऊन परत  जाताना जीवनाचा तंत्रमंत्र आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन जाईल, असा आशीर्वाद माता महाकालीने द्यावा. मनपाचे नवनिर्मित रुग्णालय तिसऱ्या लाटेत  रुग्णांसाठी ‘आसरा’ ठरेल, असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महानगरपालिकेच्या ‘आसरा’ …

Read More »

आरक्षण व हक्क हे लढून आणि लढूनच मिळत असतात.

आरक्षण व हक्क हे लढून आणि लढूनच मिळत असतात. मराठा आरक्षणाचा सर्वोच्य न्यायालयात निकाल लागल्या नंतर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचा मुद्धा असंतोषाचा केंद्र बिंदू ठरत आहे.राज्यात व केंद्रात पंचांशी टक्के ओबीसी,एस सी,एसटी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि विषमतावादी विचारसरणीच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनची मेम्बरशीप घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत केले.शासन यंत्रणेवर दबाव निर्माण करून शासन यंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे …

Read More »

माजी मंत्री आम.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मोफत आरटीपीसीआर चाचणी., वरोरा वासियानी मा.मुनगंटीवार चे मानले आभार.

माजी मंत्री आम.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मोफत आरटीपीसीआर चाचणी. वरोरा वासियानी मा.मुनगंटीवार चे मानले आभार. वरोरा –       वरोरा  तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोनाची लक्षणे असणारे अनेक नागरिक चाचणीसाठी येथील कोविड चाचणी केंद्रावर येत आहेत परंतु या केंद्रावर होणारी नागरिकांची गर्दी विचारात घेऊन राज्याचे माजी अर्थमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून येथील नगर परिषदेच्या …

Read More »

वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार., कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप.

वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार.   कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. वरोरा  –    येथील औद्योगिक वसाहत परिसरातील साई वर्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला दिवाळखोरीत काढून ६ हजार२०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या  तत्कालिन मालक किशोर सेथूरमन विरुद्ध  जय लहरी इंटरप्राइजेस कंपनीच्या संचालकाने पोलिसात तक्रार  दाखल केली आहे.आज मंगळवार दि.१८ मे रोजी दाखल केलेल्या या तक्रारीतून आर्थिक फसवणुकीचा आरोप …

Read More »