Breaking News

धार्मिक

जाणून घ्या…घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

  विश्व भारत ऑनलाईन : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा …

Read More »

तिरुपती बालाजी : नेमकी किती संपत्ती?

विश्व भारत ऑनलाईन : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता …

Read More »

रेल्वेत नवरात्र, दिवाळीसाठी वेटिंग

विश्व भारत ऑनलाईन : श्रावणपासून उत्सवांची लगबग सुरु झालीय.गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी प्रवाशांना महिनाभर तिकीट मिळत नसल्याचे दिसत आहे.प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जादा गाड्यांची मागणी मध्य …

Read More »

235 वर्षांपूर्वीची परंपरा..!नागपूरमध्ये भोसल्यांच्या मस्कऱ्या बाप्पाचे मंगळवारी आगमन

  विश्व भारत ऑनलाईन : संत्रानगरीतील ऐतिहासिक मस्कऱ्या बाप्पांचे मंगळवारी आगमन होणार आहे. यंदा या गणपतीला 235 वर्षे पूर्ण होत आहेत. इ. स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवात कशी झाली… श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी 1787 मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा …

Read More »

पितृपक्षाला सुरुवात : महत्व आणि श्राद्धचे नियम

  विश्व भारत ऑनलाईन : पितरांना किंवा पूर्वजांना श्राद्ध टाकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवाडा पितृपक्ष म्हणून मानला जातो. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. हिंदू धर्मात पितृपक्षाला प्रचंड महत्व आहे. लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा 9 व 10 सप्टेंबरला आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरवात होत …

Read More »

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत. धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन …

Read More »

केदारनाथ धामचे ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन

केदारनाथ : जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा …

Read More »

गणपती बाप्पा मोरया,आज जडअंतकरणाने निरोप

नागपूर : कोरोनानंतर निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून आज शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विसर्जन होणार आहेत.यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील. मुंबईत १ लाख, नागपुरात 20 हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल. सर्वत्र पावसाचा इशारा; राज्यात पोलिसांचा बंदोबस्त राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता …

Read More »

सप्तश्रृंगी देवीचे घ्या दर्शन,26 सप्टेंबरपासून उघडणार मंदीर

नाशिक : जगप्रसिद्ध सप्तश्रृंगी देवीचे मंदीर मागील 45 दिवसापासून दर्शनासाठी बंद आहे. मात्र, भाविकांची प्रतिक्षा संपली असून नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी मंदीर खुले होणार आहे. मंदीर बंदचे नेमके कारण काय? मंदिराचे काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे.नाशिकमध्ये जुलैमध्ये ढगफूटी झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच झालेल्या पावसामुळे अनेक भावीक जखमी …

Read More »

माहेरवाशीण गौराईंचे आगमन

अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय. मुहूर्त कोणता? गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, …

Read More »