विश्व भारत ऑनलाईन : जालना,परभणी,हिंगोली,नांदेड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही औरंगाबाद व बीड जिल्ह्याला …
Read More »सोयगाव, कन्नडला पावसाने झोडपले : शेतकरी आर्थिक संकटात
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या पिशोर आणि सोयगावच्या तालुक्यातील बनोटी भागात ढगफुटीदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णा – नेवपुर, अंजना-पळशी, वाघदरा यासह परिसरातील छोटी पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. सोयगाव तालुक्यातील बनोटी, किन्ही, वडगाव, दस्तापूर, गोंदेगाव,उप्पलखेडा, मोहळाई भागात कापुस आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अंजना -पळशी नदिपात्रातील …
Read More »कुणामुळे फिस्कटला वेदांता प्रकल्प, राज ठाकरेंचा नागपुरात सवाल… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प नेमका फिस्कटला कुठे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. राज ठाकरे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. एकदा फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्पावरून आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असतात. त्यामुळे राजकीय नेत्यांना तो कुठे गेला काय …
Read More »राज ठाकरे आज घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण?
विश्व भारत ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरे अनेक नेत्यांच्या तसंच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारीच ठाकरे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. यानंतर आता आज राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे. …
Read More »मनपा निवडणुकीच्या कामाला लागा-राज ठाकरे
विश्व भारत ऑनलाईन : महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा, अशाही सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून (दि.१८) जल्लोषात सुरूवात झाली. यावेळी नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना …
Read More »नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे …
Read More »आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था
विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …
Read More »औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …
Read More »राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर
विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …
Read More »सुरेश भट यांचे शिष्य व ज्येष्ठ गझलकार निलकांत ढोले यांचे निधन
विश्व भारत ऑनलाईन: ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कविता संग्रह लिहिणारे आणि ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य निलकांत ढोले (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटे नागपुरातील हिंगणा मार्गावरील साईनगर येथे त्यांचे निधन झाले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले. निलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ ह्या संग्रहाला …
Read More »