वर्धा: प्रतिनिधी : जिल्ह्यातील कृषी कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानावर एका एकरसाठी 30 किलो सोयाबीन मिळणार होते, मात्र कृषी कार्यालयात बोलावून 15 किलो बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर 30 किलो सोयाबीन बियाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्धा तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना शेखर कोल्हे, विलास पाल, अमोल भोयर, सूर्यभान मेसरे, मंगेश निवळ उपस्थित होते.