Breaking News

विश्व भारत

लाचखोरीत ‘पोलीस’ नव्हे, ‘महसूल’च अव्वल, ‘पीडब्लूडी’चे 14 अधिकारी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा केलेल्या 723 कारवाईत सर्वाधिक 173 प्रकरणे एकट्या महसूल विभागाची आहे. त्यामुळे पोलीस विभागालाही महसूलने मागे टाकले आहे. यामध्ये वर्ग 3 च्या लोकसेवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस विभागात लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा समज आकडेवारीने फोल ठरविला आहे. लाचखोरीत पोलिस नव्हे, तर महसूल विभाग सध्या आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल पोलिसांचा नंबर लागतो. …

Read More »

जुनी पेन्शन न दिल्यास शिंदे सरकारला 52 लाख मतांचा फटका

जुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क आहे. तो मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने पेन्शन नाकारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक संघटितपणे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. तर, जुनी पेन्शन न दिल्यास शिंदे सरकारला 52 लाख मतांचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी अमरावतीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अमरावतीचा पुढाकार हाच इतर जिल्ह्यांसाठी आदर्श …

Read More »

400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार …

Read More »

नवीन संसद भवनचे ‘विदर्भ कनेक्शन’

देशातील संसदेच्या नवीन इमारतीसाठी अर्थात सेंट्रल विस्टासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर केला जात आहे. चंद्रपूर हा वनांनी नटलेला जिल्हा आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या जंगलातील सागवान लाकूड नवीन संसद भवन म्हणजे नवी दिल्ली इथे तयार होत असलेल्या ‘सेंट्रल विस्टा’मध्ये वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेपी नड्डा यांच्या जाहीरसभेत दिली. …

Read More »

वाहन चालविताना मोबाइल वापरल्यामुळे १,०४० लोकांचा गेला जीव

वाहन चालविताना मोबाइल वापरल्यामुळे सन २०२१मध्ये एकूण १,९९७ रस्ते अपघात झाले. यात १,०४० लोकांना जीव गमवावा लागला, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालामधून समोर आली आहे. लाल सिग्नल ओलांडल्यामुळे सन २०२१मध्ये ५५५ रस्ते अपघात झाले. यात २२२ लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे या अहवालात म्हटले आहे. तर २०२१मध्ये खड्ड्यांमुळे एकूण ३,६२५ अपघात झाले असून, १,४८१ लोकांचा …

Read More »

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे …

Read More »

नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश! ५० हजार तरुणांची फसवणूक

पोस्ट खात्यात सहायक पोस्ट मास्टर पदासाठी बोगस भरती केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाचा फोन आल्यास सावधान असावे. तसेच पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओडिशा पोलिसांनी अलीकडेच उघडकीला आणले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालवणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कॉलसेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सिम कार्ड, आर्थिक …

Read More »

उद्यापासून डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल

राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.शनिवारपर्यंत वेळ देऊनही चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ संघटना ठाम आहे. राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहेत.दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. …

Read More »

नागपुरातील जैन कलार समाजाच्या निवडणुकीत घोळ

जैन कलार समाजाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी पत्रकार परिषदेत केला.नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती तिडके यांनी दिली. काय आहे प्रकरण?👇👇👇 26 डिसेंबरला समाजाची निवडणूक झाली. 27 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता तीन दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आलेला नाही. याच काळात घोटाळ्यांनी कूच केली. …

Read More »

नागपूर : रामटेकच्या ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश,शेखर दूंडे यांच्या कामाचा धडाका

रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील देवलापार आदिवासी भागातील छवारी आणि छवारीटोला या गावातील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केलाय. रामटेक तालुक्याचा विकास थांबला असून यास विद्यमान आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, असा आरोप करीत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांचे सुटणारे प्रश्न लक्षात घेऊन, विद्यमान खासदार …

Read More »