Breaking News

विश्व भारत

वर्ग-2 चा मुद्दा : महसूल अधिकाऱ्यांनी केला कोटींचा घोळ

बारामतीत महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी न घेता त्रयस्थ अर्जदाराच्या नावावर नवीन शर्तीची वर्ग-2 ची जमीन वर्ग केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात शासनाचा 3 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल संगनमताने बुडविण्यात आला, अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याप्रकरणी धवडे याजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे बुद्रुक येथील गट क्रमांक 94/2 मधील मूळची वन विभागाची …

Read More »

राज्यात 50 गावांमध्ये भूकंपाचा धक्का; भीतीने नागरिक घराबाहेर

हिंगोली जिल्हयातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील सुमारे 40 ते 50 गावांमध्ये आज,रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.तसेच नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे. कुठे बसलाय धक्का… वसमत, कळणनुरी व …

Read More »

भ्रष्ट अभियंता गोडसेंना वाचविण्यासाठी केंद्रेकरांची ‘फिल्डिंग’!

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात बनावट वृक्षारोपण घोटाळा उघडकीस आलेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी …

Read More »

व्यायाम करताना डॉक्टरचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

व्यायाम करताना एका 41 वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. संजीव पाल असे डॉक्टरचे नाव आहे. व्यायाम करीत असताना ते अचानक कोसळले. रुग्णालयात त्यांना घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read More »

तुळस, मसाला चहाने पळवा थंडी…!

थंडीच्या दिवसात गरमागरम चहा मिळाल्यास उबदारपणा वाढतो. घरच्या घरी आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा याबाबत येथे सांगणार आहो. इतकेच नव्हे तर त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. यात आयुर्वेदिक काढ्याचा समावेश होतो. खरतरं चहा मुळे आम्लपित्त, भूक मंदावणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की जे तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढवू शकतात. तुळस अश्वगंधा, मसाला चहा आणि …

Read More »

नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा कापला

औरंगाबादमधून एक घटना समोर आली आहे. जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जात असताना एका महाविद्यालयीन तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने कापल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मांज्यामुळे तरुणाचा गळा आठ इंच कापला गेला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. चैतन्य शंकर मुंढे (वय 19) असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटना अशी घडली… चैतन्य हा मुळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील …

Read More »

धक्कादायक : खराब हवामानामुळे महाराष्ट्रात १९४ जणांचा मृत्यू

देशात खराब हवामानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह आणि महाराष्ट्र असा क्रमांक आहे. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनूसार, बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.गतवर्षी वादळ-वारे तसेच …

Read More »

नागपुरात थंडीमुळे दोघांचा मृत्यू

नागपुरात थंडीचा जोर वाढला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. डिसेंबरपर्यंत थंडी कमी होती. अचानक थंडीचा पारा वाढला आहे. लोकं शेकोटीचा आधार घेत आहेत. मागील दोन दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. शनिवारी सूर्यदर्शन झाले. पण, थंड हवांचा जोर कायमच आहे. या थंडीत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. येत्या काळात पुन्हा थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read More »

‘पीडब्लूडी’चे दुर्लक्ष : गौण खनिज वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची लागली वाट

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते तयार कारण्यात आले. या उभारलेल्या रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची अवजड वाहनाद्वारे करण्यात येते. वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व जिल्हा प्रमुख मार्गांची चाळण झाली आहे. त्यामुळे एमएसआरडीसी आणि एनएचएकडून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता मोबदला पाहिजे. यासंदर्भात सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम …

Read More »

उंचीनुसार मुलींचे वजन किती पाहिजे…!

सध्याच्या घडीला फीट आणि निरोगी राहणं हे एक मोठं आव्हान आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ,अयोग्य आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते. वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते …

Read More »