चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील चांदापूरच्या शेतात तेरा फूट लांबीचा अजगर काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास पकडण्यात आला. यावर्षी मूल तालुक्यातून 20 अजगर पकडल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत सापडलेला हा सर्वांत मोठा अजगर असल्याचे कळते. येथे सापडले अजगर बंडू कडूकर यांच्या शेतात धान कापणी सुरू आहे. धान कापणी करताना मजूरांना भला मोठा साप असल्याचे दिसून आले. त्यांनी काम बंद करून दिलीप पाल यांना याची …
Read More »फडणवीसांविरोधात फेसबुक पोस्ट : पुण्यात तरुणाविरोधात गुन्हा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असे या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महविकास आघाडी …
Read More »कैद्याला मागितली 50 हजाराची लाच : हवालदारासह महिलेला पकडले
पॅरोलवरील कैद्याकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील हवालदार बाजीराव जोतिबा पाटील (वय 54) आणि रेहाना आसिफ सय्यद (वय 48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून, सध्या तो कारागृहाबाहेर आहे. यादरम्यान हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला 50 हजार रुपयांची लाच …
Read More »हेडफोनमुळे कानाचा कॅन्सर : मोठ्या आवाजात गाणी ऐकताय, बहिरेपणाचाही धोका
संगीत थिरकायाला लावते. संगीत मनाला स्पर्श करते. मात्र, संगीत ऐकताना तुमच्या कानालाही त्रास होऊ शकतो. सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी धक्कादायक माहिती आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने जगभरातील १२-३४ या वयोगटातील तब्बल १३५ कोटी लोकांना बहिरेपणाचा येण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या मोबाईल फोनचे डिवाईस हेडफोन्स आणि ईयरबड्स तुमच्या बहिरेपणाच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. …
Read More »‘पीडब्लूडी’चा आधी नकार, आता होकार : नव्या उड्डाणपूलांबाबत प्रस्ताव
औरंगाबाद महामार्गवरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर महापालिकेने उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली होती. मात्र, आधी नकार दिल्यानंतर आता या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने यू-टर्न घेत स्वतःहून शासनाकडे तीन उड्डाणपूलांची आवश्यकता असल्याचे सांगत प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार शासनाने मंजुरी दिल्यास हॉटेल मिरची चौक, सिद्धिविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका चौक यातील ठिकाणी औरंगाबाद महामार्गावर नाशकात उड्डाण पुल दिसेल. ऑक्टोबर महिन्यात …
Read More »सावरकरांविरुद्ध वक्तव्य : राहुल गांधी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधीविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस स्थानकात आयपीसीच्या ५०० आणि ५०१ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य सावरकरांची बदनामी करणारे आणि लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचे तक्रारीत नमूद केले …
Read More »थंडीत मेथी अन् डिंकाच्या लाडूंना मागणी… विविध रोग करा दूर
हिवाळ्यातील थंडी वाढली की, अनेकांना मेथी आणि डिंकाच्या लाडूचे वेध लागतात. आरोग्यवर्धकतेसाठी हिवाळ्यात मेथी आणि डिंकाचे लाडू फायदेशीर आहे. त्यामुळे थंडी वाढली कि, अनेक घरात डिंकाचे लाडू करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. मात्र इतर खाद्य पदार्थांप्रमाणेच डिंकाच्या लाडूसाठी लागणारा सुका मेवा देखील यंदा महाग झाला आहे. त्यामुळे डिंकाचा लाडू यंदा महाग होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुकामेव्याच्या दरात यंदा सुमारे …
Read More »गव्हापेक्षा चढा दर : ज्वारीला सोन्याचे दिवस
ताटातून गायब झालेल्या भाकरीला पुन्हा मागणी वाढू लागल्याने जुने ते सोने म्हणण्याची वेळ आली आहे.मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा हुरडा आता डोळ्यांनीही दिसेनासा झाला आहे, तर गरिबाची म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या ताटात दिमाखात मिरवणारी भाकरी कालौघांत गरिबांच्याही ताटातून बाद झाली आहे. ती आता थेट हॉटेल, भोजनालयांमधील …
Read More »हिवाळ्यात मुलांची घ्या काळजी!त्यांना ठेवा ‘उबदार’
ऋतुमानाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. याचा सर्वात पहिला आणि अधिक परिणाम मुलांवर होतो. थंड हवा आणि वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन सारखे आजारी पडू शकतात. म्हणून वेळीच योग्य काळजी घेतल्यास, तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवणे शक्य आहे. कडाक्याच्या थंडीत खालील टीप्स फॉलो करुन तुम्ही मुलांना उबदार वातावरण देवू शकता. मुलं पाणी पितात का? याकडे आवर्जून लक्ष द्या थंडीच्या दिवसात मुलांना …
Read More »अटॅकचे सर्वात मोठे कारण एकटेपणा : भावना व्यक्त करा, दीर्घ श्वास घ्या
एकटेपणा कधी आनंद तर कधी निराशेत घेऊन जाऊ शकतो. तसेच एकटेपणा हे पॅनिक अॅटॅकचे सर्वात मोठे कारण आहे. सतत चिंताग्रस्त व तणावग्रस्त राहिल्याने पॅनिक अॅटॅकचा धोका वाढतो. मनाची भीती किंवा मनातील भावना व्यक्त करू न शकल्यामुळे तो फोबिया किंवा ध्यास बनतो. याचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. विशेषतः बालके व किशोरवयीन मुलांना, मुलींना धोका जास्त असतो. विशीपर्यंत पॅनिक अॅटॅकचा धोका सर्वाधिक …
Read More »
विश्वभारत News Website