छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवप्रेमींच्या टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाला थेट घरचा आहेर दिला. फडणवीस काय म्हणाले? “मला वाटत नाही की, …
Read More »महाराष्ट्रातील रस्त्यावर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे भाषण… नक्की ऐका
मटक्यात शिजणारे बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरातही
बिहारच्या मांसाहार डिश देशात लोकप्रिय आहे. याबद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला, तूप आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे.मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूरच्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे. ओळख कुठून मिळाली? चंपारण मटणाची सुरुवात प्रथम …
Read More »वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई
भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्तपणे केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे …
Read More »अभिनेत्री एंड्रिला शर्माचे 24 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन
बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले.तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. अलीकडेच तिला कॅन्सरचे निदानही झाले होते. अभिनेत्री एंड्रिला शर्माची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्या कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी …
Read More »डेंग्यू-मलेरियाला ठेवा लांब, मच्छरांपासून ‘हे’ तेल करेल संरक्षण
हिवाळा येताच डास वाढतात. यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे …
Read More »विदर्भाला हुडहुडी ; राज्यातही पाच दिवस कडाक्याची थंडी
राज्यभरात थंडीची हुडहुडी सुरू झालीय. येत्या काही दिवसात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा मिळालाय. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार …
Read More »वाघाच्या हल्ल्याविरोधात वनविभागाचे शेताला संरक्षण
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटनामुळे शेतातील धानपिकांची कापणी लांबणीवर पडत आहे.जंगलालगत असलेल्या गावांमध्ये महिलांचे धानकापणीला जाण्याचे धाडस होत नाही. या परिस्थितीमुळे धान कापणी कशी करायची? असा प्रश्न उपस्थित झालेला होता. यावर आता वनविभागाने जंगलालगत शेतावर खडा पहारा देण्यास सुरूवात केलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वनविभागाने हा प्रयोग केला आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेली गावे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका हा …
Read More »तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या नंदी बैलाचे निधन
नंदी बैलाला वैदिक धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक परंपरेनुसार नंदी बैल म्हणजे भगवान शंकराचे प्रमुख वाहन आहे. त्यामुळे लोकांच्या भावना देखील आणखी प्रकट होताना दिसतात. अशातच आता मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्हातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम प्रसिद्ध आहे. जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन झाले आहे. तीन शिंगे, तीन डोळे प्रत्येक नंदी बैलाला दोन शिंगं असतात. मात्र, जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध …
Read More »लातूर : किल्लारी परिसरात पुन्हा भूकंप
लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरातील गावांना येथे आज शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास भूकंपाचा सोम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 2.4 अशी झाली आहे. रात्री लोक गाढ झोपेत असताना दोन वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला व जमीन हादरली. यामुळे किल्लारी, किल्लारी वाडी, यळवट, शिरसल, मंगरुळ जुने किल्लारी, एकोंडी गावातील नागरिक घराबाहेर आले. घाबरून नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. …
Read More »
विश्वभारत News Website