विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली. बंडाचे कारण? …
Read More »दुर्गाष्टमीचे महत्त्व आणि कधी करावी पूजा…
विश्व भारत ऑनलाईन : हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक मासाच्या शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी मानली जाते. दुर्गाष्टमीचे हे व्रत जो कोणी करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गाष्टमीला देवीच्या संपूर्ण महागौरीच्या स्वरुपातील पूजा होते. दुर्गाष्टमीचे व्रत केल्याने घरात सुख-शांती नांदते. कुटुंब धन-धान्य आदी सर्व सुखांनी परिपूर्ण होते. मात्र, शारदीय नवरात्रीच्या वेळी येणा-या दुर्गाष्टमीचे महत्त्व दरमासाला येणा-या दुर्गाष्टमीपेक्षा खूप जास्त असते. महिषासूर …
Read More »‘आयएएस’अधिकाऱ्याला कोसळले रडू… काय कारण?
विश्व भारत ऑनलाईन : आयएएस अधिकाऱ्यांच्या स्वभाव किंवा कठोर निर्णयाने त्यांच्या हाताखालील बरेच अधिकारी, कर्मचारी दुखावले जातात. परंतु, काही अधिकारी आपल्या स्वभावाने आणि कामाच्या पद्धतीने कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मन जिंकून जातात.आणि हे सिद्ध कधी होते तर त्यांची बदली झाली की त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी. किंवा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला. असाच निरोप समारंभ अलीकडेच नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये घडला आहे. जिल्हा परिषदेच्या …
Read More »नाशिक : सप्तश्रुंगी गडावर पाच लाख भाविक अडकले
विश्व भारत ऑनलाईन : नाशिकच्या जगप्रसिद्ध सप्तशृंगी गडावर सध्या जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांची गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावातच रोखून ठेवलं आहे. तर, यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. खरंतर सध्या नवरात्र सुरु आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी जमणं हे साहजिकच आहे. पण आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणारा अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय वाघमारे असे त्याचे नाव आहे. तर, हॉटेलचे बील द्यायचे नव्हते त्यामुळे त्याने बनाव केल्याचा दावा केल्याचे कळते. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …
Read More »धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण? गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
विश्व भारत ऑनलाईन : धनगर समाजाचे खरे वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार आहेत,अशी जहरी टीका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसऱ्या मेळाव्यात तूफान फटकेबाजी केली. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी झाली पाहिजे, असे विविध मुद्दे मांडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यावर भाषणादरम्यान जोरदार टीका केली. दरम्यान …
Read More »अतिक्रमण – वनविभागाचा दबाव ? : शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
विश्व भारत ऑनलाईन : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी गंभीर आहे.गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जागेवर १९८४ पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. १) वनअधिकारी व …
Read More »आमदार अस्वस्थ : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास सरकार कोसळणार?
विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे दिपक केसरकर हे अजून दोन वर्ष शिक्षण मंत्री राहतील, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पाटील यांनी हे विधान करून राज्यातील शिंदे सरकार दोन वर्ष टिकणार असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत वेगळीच भविष्यवाणी केली आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी …
Read More »जमलं नाही तर कुस्ती…दानवेंचे अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच …
Read More »
विश्वभारत News Website