Breaking News

विश्व भारत

प्रेक्षकांच्या भेटीला नागराज मंजुळेंचा ‘नाळ 2’ लवकरच

  विश्व भारत ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं. सैराट,फॅन्ड्री ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटात नागराज मंजुळे दिसले होते. या चित्रपटातील कथानक आणि बालकलाकारपासून ते सर्व दिग्गज …

Read More »

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल… वाचा काय आहे प्रकरण…

  विश्व भारत ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, असे विधान केले होते. त्यानंतर आता छगन भुजबळ आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम …

Read More »

लम्पीचा धोका कोंबडे, वाघांनाही? खरं काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : लम्पी रोगाचा प्रसार होऊ लागल्यापासून विविध अफवा उडू लागल्या आहेत. कोंबड्यांमध्ये हा रोग पसरतो आहे, वाघांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आजघडीला असा कोणताही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या केवळ गोवंशावर हा रोग दिसून येतो आहे. म्हशी किंवा बकऱ्यांमध्ये तसेच श्वानांमध्येही याची कोणतीच लक्षणे अद्याप आढळलेली नाही. तरी, …

Read More »

शेतकऱ्यांवर दिशाभूल करणाऱ्या सहसचिवाला मंत्र्याचा झटका… विदर्भाशी कनेक्शन काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच हायव्होल्टेज झटका दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहसचिवाने हेतूपरस्परपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचेही फर्मान चव्हाण यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मंत्र्याची फिल्डिंग?… कोणता जिल्हा?

विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले.आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचीही बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. …

Read More »

भंडारा : वाघाने घेतला दुसरा बळी

  विश्व भारत ऑनलाईन : आठवड्याभरापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केल्याच्या घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात घडलेल्या या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तेजराम बकाराम कार ( वय ४५, रा. कन्हाळगाव, ता. लाखांदूर) असे वाघाच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव …

Read More »

पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याज दरात वाढ!

  विश्व भारत ऑनलाईन : किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांसह इतर अल्प बचत योजनांत गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीवरील व्याज दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9 …

Read More »

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 44 आणि भारतीय वन सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याची प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातही बदली सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बदली झालेले पोलीस उप आयुक्त, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक …

Read More »

अक्रोड खा, हृदयरोग पळवा!

  विश्व भारत ऑनलाईन : हृदयविकार जडण्यामागे खराब जीवनशैली व आहाराचे कारण मोठे असते. शरीर शक्य तितके सक्रिय ठेवणे आणि सकस आहार घेणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या नियमित आहारात अक्रोडाचा समावेश केला तर त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अक्रोडामुळे हृदयाला धोकादायक आजारांपासून संरक्षण मिळते आणि मृत्यूचा धोका कमी होतो. जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी …

Read More »

मृत्यूचा सापळा : 44 वन्यप्राणी ठार.. वाचा सविस्तर

  विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील पेंच ते खवासा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेशातील खवासा सीमेजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडला आहे. हा परिसर ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असून वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी तो बांधण्यात आला …

Read More »