Breaking News

विश्व भारत

टेन्शन वाढलंय! वर्षभरात 15 एलपीजी सिलिंडर मिळतील… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : आता घरगुती एलपीजी ग्राहकांना नवीन नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळतील. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. …

Read More »

44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : भीमनवार नवे परिवहन आयुक्त- उस्मानाबाद, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बदली

विश्व भारत ऑनलाईन : सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रशासकीय सेवा(आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त पदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. …

Read More »

‘धनुष्यबाण’ चिन्ह, पक्षाबाबत काही महिने लागण्याची शक्यता

  विश्व भारत ऑनलाईन : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.याचा निकाल लागण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वेळ लागण्याची शक्यता आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले.तोपर्यंत चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणालाही न देता त्याऐवजी इतर पर्याय …

Read More »

नागपुरच्या धर्तीवर औरंगाबादेत मेट्रो धावणार … वाचा सविस्तर

  विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मेट्रोचा कायापालट करणाऱ्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्लीत भेट घेत औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालासंबंधी सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे महामेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर… डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत …

Read More »

मोफत रेशन सुरुच राहणार, PMGKAY योजनेला मुदतवाढ

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील ३ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे गरजूंना पुढील तीन महिने मोफत रेशन मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. कोरोना काळात २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो धान्य मोफत मिळते. मार्च …

Read More »

भगर खाताय… सावधान! 156 जणांना विषबाधा.. कुठे आला प्रकार उघडकीस… वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत. वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची …

Read More »

सर्वोच्च न्यायालय : नागपूर, औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे भवितव्य आज ठरणार

  विश्व भारत ऑनलाईन : मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी(28 सप्टेंबर)सुनावणी होणार आहे. या निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग संख्येबाबत घेतलेल्या निर्णयानुसार होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयानुसार होणार, यावर या सुनावणीत निर्णय होणे अपेक्षित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२१ …

Read More »

शिंदे × ठाकरे : बहुमत सिद्ध करणाऱ्याची शिवसेना

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात धाव घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बाजू मांडण्यास सांगितलं होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शपथपत्र लिहून घेण्याचा कार्यक्रम रावबला. दुसरीकडे इतर राज्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही केले जात आहे. शिंदे-ठाकरेंचे …

Read More »

गडचिरोली : नागरिकांनी जाळले तब्ब्ल १० ट्रक… कारण काय?

  विश्व भारत ऑनलाईन : सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली. ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात …

Read More »

सरकारच्या डोक्यात काय चाललंय? बदल्या होणार किंवा नाही…सर्वच विभागात संभ्रम

विश्व भारत ऑनलाईन : मे आणि जून हा सरकारी बदल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साधारण मार्च महिन्यानंतर जूनपर्यंत राज्यातील सुमारे 40 हजार शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिफारस पत्रे मंत्रालयात येत असतात. आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींकडून संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आग्रह केला जातोय.या शिफारस पत्रांचा ओघ आणि त्याची संख्या पाहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »