नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ …
Read More »‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या
मोहन कारेमोरे नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले. राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, …
Read More »गणपती बाप्पा मोरया,आज जडअंतकरणाने निरोप
नागपूर : कोरोनानंतर निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून आज शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विसर्जन होणार आहेत.यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील. मुंबईत १ लाख, नागपुरात 20 हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल. सर्वत्र पावसाचा इशारा; राज्यात पोलिसांचा बंदोबस्त राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता …
Read More »अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत, खात्यात पैसे होणार जमा
मुंबई : जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटीच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले. आकडेवारी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना …
Read More »एक चिखलात फसून, दुसरा अपघातात बिबट ठार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वनपरिक्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत गुरुवारी संध्याकाळी पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण केले.त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत …
Read More »अप्पर जिल्हाधिकारी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
नाशिक : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून हत्या केली होती. शिक्षेचे स्वरूप या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा पूर्वीच मृत्यू झाला. तर,यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उर्वरित उरलेल्या तिघांना …
Read More »पेट्रोल,डिझेलचे दर होणार कमी?
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी होऊ शकतात. केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे अधिकारी वैतागले
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात मुख्यमंत्री रात्री उशीरापर्यंत बैठका आणि कामकाज करत असल्याने एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि …
Read More »थेट सरपंचपदासह १,१६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ …
Read More »नियोजित थांब्यावर बस थांबवा, अन्यथा कारवाई
मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ व ‘गाव तिथे एसटी’ अशी संकल्पना राबवून महामंडळ प्रवाशांच्या सेवेला व सुविधेला प्राधान्य देत आहे. तरीही, थांबा निश्चित असतानाही बस न थांबविणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे संकेत महामंडळाने दिले आहेत. कर्मचाऱ्यांकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून आल्यास एसटी महामंडळाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. तशा सूचना महामंडळाने सर्व आगार कार्यालयाला दिल्या आहेत. प्रवासी रस्त्यावर …
Read More »
विश्वभारत News Website