Breaking News

विश्व भारत

औरंगाबाद : मुख्यालयी रहा, अन्यथा कारवाई, वाद वाढणार

  विश्व भारत ऑनलाईन : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा विषय चांगलाच गाजत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे …

Read More »

राष्ट्रवादीने महाराष्ट्र लुटून खाल्ला, उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री – तानाजी सावंत यांची टीका

विश्व भारत ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला, असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला तसेच उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीवालेच सरकार चालवीत होते, असेही सावंत म्हणाले. उस्मानाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या हिंदूगर्जना मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली. सावंत यांची जीभ घसरली ‘ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून …

Read More »

आमदार, खासदार शिंदे गटात : ठाकरेंना धक्का, अब्दुल सत्तार यांचा दावा

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेतील आणखी काही आमदार आणि खासदार शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत केला.आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे-मुकेश अंबानी भेट… नेमकं कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय …

Read More »

औरंगाबादला मिळाला २२ वर्षानंतर स्थानिक पालकमंत्री ; संदीपान भुमरेंकडे जबाबदारी

विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री लाभले आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या, नंतर भाजप-शिवसेना युती सरकारच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जिल्ह्याला जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री देण्यात आले होते. राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्यावेळी औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत …

Read More »

फडणवीसांची घोषणा : विदर्भ-मराठवाड्यासाठी ‘नागपूर – गोवा’ इकॉनोमिकल कॉरिडॉर

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत आयोजित एका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात …

Read More »

फडणवीस नागपूर, अमरावतीचे पालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- …

Read More »

नागपुरात फडणवीसांसमोरच गडकरींची नाराजी… असं काय झालं… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : अपंग व ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी काम केले नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. तर दक्षिण नागपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्ती करणासाठी केंद्र …

Read More »

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’ एअरटेल व जिओत चढाओढ दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली …

Read More »

चहाची तलब आणि अख्ख कुटुंब अपघातातून बचावले…

विश्व भारत ऑनलाईन : देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा अनेक म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता नाशिकमधून समोर आली आहे. या म्हणीचा प्रत्यय मालेगावपासून जवळ असलेल्या जळगावचोंडी या गावातील ग्रामस्थांना आला. याच चहा पिण्यासाठी गेल्याने एका कुटुंबावरील मोठं संकट टळलं. …

Read More »