Breaking News

विश्व भारत

जिल्हाधिकारी करतात कर्मचाऱ्यांचा अपमान, मंत्र्यांची मध्यस्थी

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला. विशेष म्हणजे २० ते २५ कर्मचाऱ्यांनी फक्त तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, लेखी निवेदन दिलेले नाही. गुरुवारी विमानतळावर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वागताला प्रोटोकॉलननुसार जे अधिकारी हजर नव्हते त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्या. …

Read More »

संत्रापेटीत ड्रग्ज,नवी मुंबईत कारवाई

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी नवी मुंबईत मोठी कारवाई केली. डीआरआयने शनिवारी १९८ किलो ‘हाय प्युरिटी’ क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1,476 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ‘हाय प्युरिटी’ कोकेन जप्त केले. हे ड्रग्ज संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करीसाठी आणण्यात आले होते. याप्रकरणी डीआरआयने आयातदाराला अटक केली आहे. तसेच रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या वित्तसंस्थेसह कस्टम हाउस एजंट आणि …

Read More »

‘पीयूसी’ नसल्यास पेट्रोल – डिझेल मिळणार नाही… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सर्वच शहरात प्रदुषणाचे वाढते संकट गंभीर समस्या आहे. दिल्ली आघाडीवर आहे. वाहनांच्या धुरामुळे सर्वात जास्त प्रदुषण झालेले पहायला मिळत आहे. हे प्रदुषण कमी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी एक महत्त्वाचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. 25 ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपांवर पीयूसी प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाणार नाही, अशी घोषणा दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी …

Read More »

भाजपमध्ये शिक्षक आमदारकीसाठी नागपुरातून कोणती नावे चर्चेत?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कधी काळी नितीन गडकरी यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उभे करुन भाजपच्या गडावर कब्जा केला होता. आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी …

Read More »

7/12 वर नोंदवा विहीर, झाडे ‘ई-पीक’अँपद्वारे

विश्व भारत ऑनलाईन : आता शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल लावण्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे खाण्याची आवश्यकता नाही. शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकेल. ई-पीक पाहणी …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा गांधी घराण्याला इशारा

विश्व भारत ऑनलाईन : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून गांधी घराण्याला इशारा दिलाय. चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे. राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात …

Read More »

पोलिसांचे वेतन दीडपट वाढणार… वाचा सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडचिरोलीतील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात …

Read More »

शिवसेना-धनुष्यबाण वाद : मुख्यमंत्री शिंदेची 130 वकिलांची फौज

विश्व भारत ऑनलाईन : सध्या खरी शिवसेना कोणाची? यावर चांगलाच वाद सुरु आहे. यावर निवडणूक आयोगात जेव्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे. दिग्गज वकील कोण? 130 वकिलांच्या फौजेत …

Read More »

उद्धव ठाकरेंचे विश्वसनीय मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात?

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी …

Read More »

खुशखबर! सिलेंडर दरात मोठी कपात

विश्व भारत ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 32.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. घरगुती सिलेंडर आहे त्याच दराने उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या …

Read More »