Breaking News

विश्व भारत

सनी देओल बेपत्ता

विश्व भारत ऑनलाईन : पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत. त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे. भाजप खासदार सनी देओल लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकांनी खासदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे. सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर …

Read More »

मल्टिप्लेक्स चित्रपटाचे तिकीट आता १०० रुपयांत!

विश्व भारत ऑनलाईन : मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड असेल तर आनंदाची बातमी आहे. आता मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे तिकीट फक्त 100 रुपयांमध्ये मिळू शकते. बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशाने यंदा थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढली आहे. यंदा चित्रपट फ्लॉप झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याने थिएटर चालक आता स्वस्त तिकीट देण्याचा विचार करीत आहेत. गेल्या महिन्यात, …

Read More »

वाळू तस्करी : तर तलाठी,मंडळ अधिकारी, तहसीलदार निलंबित

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील बऱ्याच भागात वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत असते. लिलाव बंद असताना नियमबाह्य वाळूची चोरी होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच मंत्री विखे-पाटील यांनी केले. ज्या भागातून वाळू चोरी केली जाते,त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात …

Read More »

पीडब्लूडीत अजब प्रकार : पदोन्नती मिळाली, नियुक्तीही मनाप्रमाणे द्या, बदल्या कधी?

विश्व भारत ऑनलाईन : पीडब्लूडीमध्ये काही उपविभागीय अभियंत्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, पदोन्नती मिळाली त्याच ठिकाणी बदली व्हावी, यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे हा घोळ वाढत असून पीडब्लूडीतील काही अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. 4-5 महिने पदोन्नतीला होऊनही रुजू होण्यास काही अभियंते अनुत्सुक असल्याचे कळते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न आहे. बदल्यांचे प्रकरण …

Read More »

म्हाडातील बदल्यांचा वाद : फडणवीस संतप्त…कारण काय?

  विश्व भारत ऑनलाईन : शासकीय बदल्या हा गंभीर विषय आहे. सरकार कोणतेही असो, नियमबाह्य बदल्या करण्यासाठी प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी आग्रही असतात. असाच प्रकार म्हाडात समोर आलाय. म्हाडातील अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार शासनाकडे नको, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही गृहनिर्माण विभागातील एका उपसचिवाने ते डावलल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे फडणवीस संतप्त झाले. उपमुख्यमंत्र्यांनी बदल्यांचे …

Read More »

ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …

Read More »

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पीएम किसान योजनेत मोठा बदल

विश्व भारत ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 11 हप्ते केंद्र सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतील सततच्या बदलांमुळे 12 वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. अनेक राज्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी अजूनही सुरू आहे. पीएम किसान योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची …

Read More »

पुरवठा कमी : सणासुदीत सोन्याची भासणार चणचण

विश्व भारत ऑनलाईन : ऐन सणासुदीत सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी भारताला सोन्याचा पुरवठा कमी केला आहे. सोन्याचा पुरवठा करणार्‍या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. या देशांतून सोन्याला अधिक दर ऑफर केला जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर भारताला केला जाणारा पुरवठा कमी केला आहे. तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटरने …

Read More »

दसरा : शस्त्र पूजनचे कारण, जाणून घ्या…

विश्व भारत ऑनलाईन : विजयादशमी (दसरा) सण आज बुधवारी साजरा केला जाणार आहे. धर्माच्या विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी सण साजरा केला जातो. सीमोल्लंघन आणि शस्त्र पूजनाविषयी खास माहिती वाचा… देवीने दानवांचा वध करून धर्म आणि देवांचे रक्षण केले. तर प्रभू श्रीरामानेही धर्माच्या रक्षणासाठी रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी देवी आणि भगवान श्रीराम यांच्या शस्त्रांची पूजा केली जाते. त्याचबरोबर धर्माच्या रक्षणासाठी …

Read More »

दसरा : खरेदीसाठी शुभ…मुहूर्त जाणून घ्या☘️

विश्व भारत ऑनलाईन : आज विजयादशमी…घट विसर्जन, वनस्पती, श्रीराम आणि शस्त्र पूजनाचे एकूण तीन मुहूर्त आहेत. शुक्ल पक्षातील दशमी तिथीमुळे हा दिवस दसरा म्हणून ओळखला जातो.या दिवसाला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात. म्हणजेच मुहूर्त न पाहता तुम्ही नवीन सुरुवात किंवा कोणतेही शुभ कार्य करू शकता. तसेच आजचा दिवस खरेदीसाठी संपूर्ण शुभ असेल. दिवस प्रत्येक युगात खूप शुभ राहिला आहे. सतयुगात या …

Read More »