Breaking News

विश्व भारत

वीज कोसळली, विद्यार्थीनी जखमी

विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. वैष्णवी अरविंद वावरे (वय 15, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (वय 15 रा. इंदोरा) ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थीनींची नावे जखमींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Read More »

पोलिसांसाठी खुशखबर : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

विश्व भारत ऑनलाईन : नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनाही सणांचा आनंद घेता यावा, यासाठी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता किती असणार सुट्ट्या? आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना …

Read More »

चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला.. कुठे घडली घटना?

विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर चारमध्ये घरात खेळणा-या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे(वय 4)ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे. या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि …

Read More »

गड्डीगोदाम परिसरात गडरचे पाणी-नागरिक, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

विश्व भारत ऑनलाईन: नागपुरातील कामठी मार्गावरील गड्डीगोदाम भागात असलेल्या सेंट जॉन शाळेच्या समोर महानगरपालिकेने गडरलाईनचे नवे काम सुरु केले होते. मात्र, हे काम महानगरपालिकेने अर्धवट सोडले. त्यामुळे गडरचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. परिणामी, शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून डेंगूचे डास तयार होत आहे.मागील महिनाभरापासून ही समस्या जैसे-थे आहे. याकडे महानगपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गडरचे …

Read More »

अतिवृष्टीतून औरंगाबाद जिल्ह्याला वगळले,शेतकऱ्यांमध्ये रोष

विश्व भारत ऑनलाईन : जालना,परभणी,हिंगोली,नांदेड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही औरंगाबाद व बीड जिल्ह्याला …

Read More »

तहसीलदार अपशब्द बोलतात, तलाठी सामूहिक रजेवर… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : जनतेसमोर वारंवार तहसीलदार अपशब्दांचा वापर करीत असल्याने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसीलदार वरणगावकर जनतेसमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अपशब्द बोलतात. यामुळे मानसिक खच्चीकरण होत असून जनतेत तलाठी यांची प्रतिमा मलीन होत आहे. यासंदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून वरणगावकर यांची संग्रामपूर तहसीलदार …

Read More »

धक्कादायक : दोर तुटला आणि ‘ती’ बचावली.. वाचा कुठे घडली घटना

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी विवाहितेला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे हा प्रकार उघडकीस आला.नशीब बलवत्तर होते म्हणून फाशीचा दोर तुटल्याने विवाहिता बचावली.मागच्या दाराने पळ काढत तिने कसेबसे बसस्थानक गाठत आपला जीव वाचला. तिने बहिणीला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनी सासू, सासरे व दीर वेगळे राहू …

Read More »

बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू …

Read More »

देशातील ‘ही’ बँक होणार बंद, तुमचे तर पैसे नाहीत ना? वाचा…

मुंबई : देशातील एका सहकारी बँकेला दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या बँकेची बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. या बँकेत खाते असल्यास ताबडतोब पैसे काढा, अन्यथा 22 सप्टेंबरनंतर खात्यातून पैसे काढता येणार नाही, असं आवाहनही खातेधारकांना करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन …

Read More »

अवैध वाळू प्रकरण विधानसभेत : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : विधानसभेपर्यंत गाजलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पहिल्यांदाच सर्वत्र चौकशीची थेट मागणी करण्यात आली होती.यांनतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले गौण खनिजचे काम हे त्यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तसेच कुळ,इनाम जमिनी सुनावणीची प्रकरणे …

Read More »