Breaking News

विश्व भारत

गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करण्‍याची विनंती करणारी याचिका फेटा‍‍‍ळली

विश्व भारत ऑनलाईन : गाईला केंद्र सरकारने राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. यावेळी खंडपीठाने गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी निर्देश देण्‍याचे हे काम न्‍यायालयाचे आहे का? जिथे आम्हाला वेळ खर्च करावा लागतो. तुमच्‍या कोणत्‍या मूलभूत अधिकारांवर परिणाम झाला आहे, तुम्‍ही कशासाठी न्‍यायालयात आला आहात? असे सवाल करित यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्या गोवंश …

Read More »

राजकीय धक्का, कुस्तीपटू ते राजकारणी : मुलायम सिंह यादव यांचे निधन

विश्व भारत ऑनलाईन : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.22 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. आणि रक्तदाबाच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे 1 ऑक्टोबरपासून त्यांना ICU मध्ये दाखल …

Read More »

अमिताभसोबत माझे संबंध नव्हते… रेखाचे विधान चर्चेत

विश्व भारत ऑनलाईन : रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात प्रेम होते, हे सर्वश्रुत आहे. याच प्रश्नावर रेखा एका मुलाखतीत उत्तरल्या, “हो, अर्थातच अमिताभवर प्रेम केले.पण हा तर खूप सोप्पा प्रश्न आहे कारण मला आजपर्यंत असा एखादा पुरुष, महिला किंवा मुलंही नाही भेटलीत ज्यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम नाही. मग हा प्रश्न मलाच का? मी याला नकार देईन असं वाटतं का?” …

Read More »

मोह आवरेना : अंबाझरी तलावात पोहताना मुलाचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर शहरातील अंबाझरी तलावावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या १२ वर्षीय मुलाला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्या मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. शौर्य तुकाराम कोहळे (१२, रा. लोखंडेनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. गेल्या १० महिन्यांतील अंबाझरी तलावातील हा बारावा बळी आहे. शौर्य हा शनिवारी दुपारी दोन वाजता वस्तीतील चार मित्रांसह अंबाझरी तलावावर गेला होता. चौघेही पाण्यात …

Read More »

खिश्यात मोबाईलचा स्फोट… तरुण जखमी

विश्व भारत ऑनलाईन : मोबाईल आणि माणूस जणू काही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही, असे आजच्या काळात दिसते. पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने एका तरुणाचा पाय भाजल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथे अलीकडेच घडली. वेळीच उपस्थितांनी खिशातून पेटता मोबाईल काढल्याने मोठा अनर्थ टळला. सौंदळ पुनर्वसन येथील अंकित विश्वनाथ भुते (वय 25) असे किरकोळ जखमी तरुणाचे …

Read More »

शरद पवार बरमूडा ट्रँगल, शिवसेनेला संपविले.. कोणी केली टीका.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर तिखट टीका केली आहे. “निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपेक्षित होता. शिवसेनेच्या या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ‘जो निर्णय येईल, त्याचे स्वागत …

Read More »

उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद : नाव म्हणून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ तर ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ की ‘मशाल’ चिन्ह

विश्व भारत ऑनलाईन : निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे. अशी माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीला दिली आहे. १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा …

Read More »

आता घरीच मिळवा ड्रायव्हिंग लायसन ; ऑनलाइन अर्ज कसा करावा?

विश्व भारत ऑनलाईन : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास MV-Act अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच, जर तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. याच कारणामुळे भारतात दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. तुम्हाला अशा लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याचीही गरज नाही. जसा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : ‘जिंकून दाखवणारच’

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरेसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला फोटो …

Read More »

शिंदे × ठाकरे वाद : पवारांची रणनीती ठाकरेंसाठी आधार? वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याने उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कोणते …

Read More »