Breaking News

विश्व भारत

तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; टिप्पर, ट्रॅक्टर साेडण्यासाठी मागितले पैसे

विश्व भारत ऑनलाईन : गिट्टीची वाहतूक करताना जप्त टिप्पर आणि ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करु द्यावी यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे(४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली. तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी …

Read More »

अनिल देशमुख प्रकरण? एकनाथ शिंदे-परमबीर सिंह यांची भेट

विश्व भारत ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. ही बैठक 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली.मात्र नेमके कोणत्या विषयावर भेट झाली हे अद्याप कळले नाही. नेमके कारण काय? परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल …

Read More »

शॉक! वीज बिल आणखी महाग होणार

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला मोठा शॉक मिळण्याची शक्यता आहे. वीज आणखी महाग होऊ शकते.दरवाढीसाठी महावितरणने गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली. यात वीज दरवाढीचा प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा वीज दरवाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा विद्युत बिलावर दिसून येणार आहे. महागाईत आता वीज बिलाचा ‘शॉक’ बसणार आहे. वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरणला …

Read More »

नागपुरात 25 कोटींची फसवणूक, तर कुठे 2 कोटींचा दरोडा

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पोलिसांनी २५ कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकेचे हायप्रोफाईल प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. नागपुरातील सोशल मीडियाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अजित गुणवंत पारसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजित गुणवंत पारसेने डॉक्टरांना साडेचार कोटींचा गंडा घातला आहे असंही समोर आलं आहे. डॉक्टरला गंडा नागपूर शहरातील एका …

Read More »

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण मंत्री केसरकरांचे मोठे वक्तव्य

विश्व भारत ऑनलाईन : पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर …

Read More »

दिवस करवाचौथचा : नवरा प्रेयसीसोबत सापडला रंगेहाथ

विश्व भारत ऑनलाईन : करवाचौथच्या दिवशी बायकोला बाजूला सारून प्रेयसीला शॉपिंगसाठी घेऊन जाणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भर बाजारात पाठलाग करीत बायकोने चपलाने धुवून काढत नवऱ्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरवल्याची घटना घडली आहे. नवऱ्यासोबत असणाऱ्या प्रेयसीचाही तिने खरपूस समाचार घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत संबंधित आरोपी पतीला ताब्यात घेतले. प्राप्त माहितीनुसार, संबंधित पतीला शांतता …

Read More »

भाजप नेत्यांची तक्रार भोवली?, औरंगाबाद जिल्हाधिकारी यांची बदली…आणखी 20 आयएएसच्या बदल्या…

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे सरकारचे पाठबळ असतानाही औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाल्याने सर्वाना आश्यर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महसूल कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. तर, काही भाजपच्या नेत्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चव्हाण यांच्याविरोधात फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. तर, बरेच कर्मचारी आणि अधिकारी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज होते. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील …

Read More »

आता ‘वर्क फ्रॉम पब’

विश्व भारत ऑनलाईन : कोरोना काळात घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. जगभरातील कोट्यावधी कंपन्यांनी कोरोना काळात घरी राहून वर्क फ्रॉम होम काम करण्याची दिलेली संधी नवी पद्धत प्रचलित झाली. या नवीन युगात प्रवेश केल्यानंतर अनेक कंपन्या कामाचे नवनवे प्रयोग करताना दिसून येत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेली ही पद्धत आगामी काळातील …

Read More »

आमिर खान वादाच्या भोवऱ्यात : हिंदू प्रथेविरोधात जाहिरात?

विश्व भारत ऑनलाईन : अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदू प्रथेविरोधात एक जाहिरात केली आहे. आमिर खानने भारत सोडून पाकिस्तानात राहायला जावे. नेहमी हिंदूचा अपमान करण्याचे आमिर खानने ठरविले आहे. त्यामुळे आमिर खानवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. त्यावरून नेटकरी आमिर खानवर भडकले आहेत. प्रकरण काय? एयू …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय 7 नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे गटातील सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, केदार दिघे, राजन यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात काढलेल्या महाप्रबोधन यात्रेत भाषणादरम्यान या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मोठे नेते यांच्यावर भाषणात त्यांची नक्कल करत त्याच्यावर टिकाही केली होती. …

Read More »