Breaking News

विश्व भारत

भारत-पाकिस्तान सामना रद्द? कोणी घातला खोडा… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सर्व क्रिकेटप्रेमी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची वाट पाहत असतात. येत्या रविवार 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्नमध्ये वर्ल्डपकपचा सामना होणार आहे. पण, चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरू शकते. आणि याचे मुख्य कारण ठरू शकतो तो म्हणजे पाऊस. T20 वर्ल्डकप 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्याची मजा मेलबर्नचं …

Read More »

थंडी आणि पाऊस राज्यात एकाचवेळी : डिसेंबरपर्यंत पाऊस

विश्व भारत ऑनलाईन : हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत थंडी आणि पाऊस असेल.या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी, असे वातावरण असू शकते. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस राहण्याची …

Read More »

शिंदे पुन्हा शिवबंधन बांधणार?

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे सध्या सक्रिय झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर गट एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने कामाला सुरुवात केली आहे. माजी आमदार …

Read More »

भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. नक्की काय? माधव भंडारी बीडहुन अंबाजोगाईच्या दिशेने जात होते. या दरम्यान मस्साजोगजवळ हा अपघात झाला. ॲपेरिक्षा भंडारी यांच्या वाहनावर येऊन आदळली. सुदैवाने माधव भंडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी हे सुखरूप आहेत. मात्र …

Read More »

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक : शिंदे-भाजप की मविआ, कोण होणार ‘किंग’?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कुही, भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये निवडणूक पार पडेल. एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात निवडणुका? यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील …

Read More »

गडकरी-फडणवीस-बावनकुळेंना मोठा धक्का : पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

विश्व भारत ऑनलाईन : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने पंचायत समितीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने ९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भाजपला मात्र खातेही उघडता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच …

Read More »

अजित पवार अस्वस्थ, ठाकरेंच्या काळातील मंत्री करायचे रेतीचा काळाबाजार-फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप केला. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल …

Read More »

‘सप्तश्रुंगी हिल’ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी : महसूल, परिवहन विभागाचे कर्मचारी होणार सहभागी

विश्व भारत ऑनलाईन : लाखो भाविकांचे सप्तश्रुंगी देवी श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉन 2022 सहावे पर्व’ रविवारी आयोजित केले आहे.या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशी असेल स्पर्धा? ही स्पर्धा …

Read More »

भाजप आक्रमक : सहायक निबंधक अखेर निलंबित

विश्व भारत ऑनलाईन : भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना अखेर निलंबित केले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या सहायक निबंधक यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी एकवीरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील …

Read More »