Breaking News

विश्व भारत

नागपुरात मालगाडीवरून सेल्फी घेताना मुलगा होरपळला

  विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये …

Read More »

‘शिवभोजन थाळी’त गैरव्यवहार : शिंदे-फडणवीस सरकारला संशय

  विश्व भारत ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात किंमत 5 रूपये करण्यात आली …

Read More »

भक्तांनो,जाणून घ्या…महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील नवरात्रोत्सव

विश्व भारत ऑनलाईन : 🙏तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता आहे. घटस्थापनेचा कार्यक्रम : पहाटे २.३० वाजता मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना. नंतर पंचामृत स्नान. { सकाळी ६ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा. { दुपारी १२ वाजता घटस्थापनेने मातेच्या नवरात्र महोत्सवास …

Read More »

संत्रा उत्पादनात घट, द्राक्ष आगमन लांबणीवर… कारण वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लहरी हवामानामुळे लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही …

Read More »

जाणून घ्या…घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

  विश्व भारत ऑनलाईन : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा …

Read More »

कॅन्सर, मधुमेहासह 10 रोगांवर रामबाण भाजी… कोणती ?

विश्व भारत ऑनलाईन : मल्टीविटामिन, लोह आणि अनेक पौष्टिक घटक कंटोला किंवा कटूर्ला या भाजीत असतात. कटोला जो कारल्यासारखा दिसतो, या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, तिला सर्वोत्तम भाजी म्हणतात. वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहे. जेवणात ती चविष्ट लागते. त्यात आरोग्याचा खजिनाही आहे. लठ्ठपणापासून ते मधुमेह, बीपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू यांसारख्या अनेक मोठ्या आजारांवर ती रामबाण उपाय ठरते. बरेच …

Read More »

वर्धा-देवळी मार्गावर अपघात : 12 गंभीर

  विश्व भारत ऑनलाईन : वर्धा जिल्ह्यातील देवळी मार्गावर भीषण अपघात झालाय. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले. सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले …

Read More »

बोगस रेल्वे टीसींना अटक… वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी टिसीची नियुक्ती करण्यात आली आहे. पण बोगस प्रवाशांना पकडण्यासाठी जर बोगस टीसी उभारले असतील तर? हे बोगस टीसी प्रवाशांना लुटून त्यांच्याकडून पैसे वसूल करतात, तसेच रेल्वेलाही चुना लावण्याचं काम करतात. अशाच दोन बोगस टीसींना कसारा (कल्याण-ठाणे)येथून अटक केली. काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात पावती बूक घेऊन …

Read More »

तुमचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे अन्यथा कारवाई होऊ शकते. शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं …

Read More »

तिरुपती बालाजी : नेमकी किती संपत्ती?

विश्व भारत ऑनलाईन : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता …

Read More »