Breaking News

विश्व भारत

तरुणाईत पोटासंबंधी कॅन्सर 20 टक्यांनी वाढू शकतो, कॅन्सर कशानी होतो? काहींची कारणेच सापडेना

विश्व भारत ऑनलाईन : कर्करोग म्हटलं की, पायाखालची जमीनच सरकते. हा रोग एकेकाळी वृद्धापकाळातला आजार मानला जात असे. मात्र सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोट,आतड्यांचा कर्करोग तरुणाईत वाढतोय कर्करोगाच्या विळख्यात तरुण/तरुणी जास्त प्रमाणात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. 44 देशांमधील कर्करोगाच्या नोंदींच्या अभ्यासात हे आढळून आले आहे. आतड्यांसंबंधी आणि इतर 13 प्रकारचे कर्करोग वेगाने वाढत …

Read More »

भाजप चिंतेत?: नागपूर जिल्हा परिषदेवर सुनील केदारांचे वर्चस्व

विश्व भारत ऑनलाईन : सर्वांचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे या अध्यक्षपदी निवडून आल्या. भाजपलाही सुनील केदार यांचे वर्चस्व रोखण्यात यश आलेले नाही. परिणामी, भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. यातून सुनील केदारांची ग्रामीणमध्ये पकड किती मजबूत आहे याची प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून …

Read More »

विराट कोहली कुणाला डेट करतोय?वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. विराटचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झालेले आहे. मात्र, विराट एका दुसऱ्या मुलीला डेट करतोय का?अशी चर्चा आहे. एका फोटोमुळे तर प्रेम प्रकरण खरंच आहे का? असा प्रश्न पडलाय. विराट कोहलीचा एका मुलीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. या फोटोत असणारी ती मुलगी कोण …

Read More »

पुन्हा नागपुरात गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांना धक्का, जिल्हा परिषदेत काँग्रेसने मारली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बाजी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने गड कायम राखला आहे. काँग्रेसच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील मुक्ता कोकरड़े नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष (मत प्राप्त 39) आणि काँग्रेसच्याच गोधणी येथील कुंदा राउत (मत प्राप्त 38)यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. तर,भाजपच्या मदतीने उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांना केवळ 15 मत मिळाली. त्यामुळे भाजपच्या नियोजनाला …

Read More »

यज्ञ सुरू आणि भोलेनाथच्या मूर्तीवर अवतरले नागराज

विश्व भारत ऑनलाईन : भगवान भोलेनाथचे कोट्यवधी भाविक आहेत. भाविकांनी श्रद्धेने भोलेनाथची पूजा केल्यास त्यांना दर्शन मिळते. असाच प्रसंग नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी समोर आला. तेथे कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. हा यज्ञ सुरू असताना एक घटना घडली. चक्क भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन् या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे …

Read More »

ग्रामपंचायत निकाल : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी 74 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. तसेच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. यात नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, …

Read More »

मान्सून २४ पर्यंत! विदर्भातून माघार, मराठवाड्यात येलो अलर्ट

विश्व भारत ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला. मात्र, तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. …

Read More »

दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण

विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …

Read More »

5G च्या नावाने फसवणूक, तुम्हालाही ‘हा’ मेसेज आल्यास सावधान

विश्व भारत ऑनलाईन : देशात 5G सेवा सुरु झाली.या सेवेची घोषणा होताच एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी निवडक शहरांमध्ये 5G सेवेला सुरुवात केली आहे. यानंतर ग्राहकांची देखील स्मार्टफोनमध्ये 5G सेवा सुरु करण्याची लगबग सुरु झाली.या संधीचा फायदा घेत काही सायबर चोरट्यांनी फेक मेसेज पाठवत, ग्राहकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर वेळीच सावध …

Read More »

वाळूमाफीयांकडून तहसीलदारांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; आठ आरोपींविरूद्ध गुन्हा

विश्व भारत ऑनलाईन : वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यात ही घटना घडली. पथकाला धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी …

Read More »