विश्व भारत ऑनलाईन : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन हेल्पलाइन नंबर 112 वर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. टार्गेटचे ठिकाण मुंबईतील इनफिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल सांताक्रुझ हे बॉम्बने उडविणार असल्याचा दावा या निनामी फोनमध्ये करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक …
Read More »खरगे अध्यक्ष, तरीही सोनिया गांधींकडेच रिमोट?
विश्व भारत ऑनलाईन : देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बुधवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. …
Read More »आवडीची भाजी न केल्याने मुलाने आईला संपविले
विश्व भारत ऑनलाईन : आईने केलेली दुधीची भाजी मुलाला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने आईला दुसरी भाजी करायला सांगितली, मात्र आईने नकार दिला. त्यावरुन संतापलेल्या मुलाने आधी आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण केली.त्याचे वडील आईला सोडवण्यासाठी आले असता त्यांनीही मारहाण केली. पण, या क्रूर मुलाचे मन भरले नाही, तेव्हा त्याने जन्मदात्या आईला पहिल्या मजल्यावरुन ढकलून दिले. या घटनेत वृद्ध महिला …
Read More »राहुल गांधी 382 किमी चालणार : महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरपासून भारत जोडो यात्रा
विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधीची भारत जोडो पदयात्रा सात नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ते नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाण्यात 382 किलोमीटर चालतील. त्यापैकी 208 किमी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चालणार आहेत. गांधी सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूरला मुक्कामी असतील. 8 तारखेला पदयात्रा सुरू होईल. दुपारी ते अटकळी गावात भोजन करून शंकरनगरला मुक्काम करतील. 9 …
Read More »काँग्रेस अध्यक्ष : खर्गे की थरूर? आज निर्णय
विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार,याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे. याकडे साऱ्या …
Read More »भाजीपाला महागणार : 42 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका
विश्व भारत ऑनलाईन : परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादान उडवली. याचा फटका सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर,उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. भाजीपाला महागणार मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील. काही …
Read More »शेतकरी चिंतेत : संत्रा,मोसंबी,लिंबूवर ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव
विश्व भारत ऑनलाईन : संत्रा, मोसंबी, लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रीनिंग जातीच्या रोगाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अकोला कृषी विद्यापीठाने यावर आवाहन केले आहे. ग्रीनिंग हा सार्वत्रिक म्हणजे जिथे फळबाग लागवड केली जातेय, त्या भागात हा रोग आढळून येतो.अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर सारख्या भागात या …
Read More »शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? पोलीस बदली प्रकरण
विश्व भारत ऑनलाईन : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचे कळते. रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि …
Read More »सुनील केदार, राजेंद्र मुळक दगाबाज : वाचा कोणी केला आरोप?
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी माजी मंत्री सुनील केदार हुकूमशाह आणि राजेंद्र मुळक दगाबाज असल्याचा आरोप रविभावन येथील पत्रकार परिषदेत केला. नेहमी आपल्या क्षेत्रातील सदस्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यासाठी केदार यांचे प्रयत्न असतात. मात्र, यावेळी आधी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही या दोन …
Read More »वाळूचा ट्रक सोडण्यासाठी लाच : नायब तहसीलदार अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : वाळूचा ट्रक सोडण्याच्या प्रकरणात नायब तहसीलदाराला १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालयात केली. शंकर महादेवराव श्रीराव (५४) असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे. अचलपूर तहसीलच्या हद्दीतून वाळू घेऊन जाणारा एक ट्रक श्रीराव यांनी २ ऑक्टोबरला पकडला होता. त्यावेळी कारवाई न करण्यासाठी त्यांनी ट्रक मालकाला …
Read More »
विश्वभारत News Website