Breaking News

विश्व भारत

निरोगी आयुष्य पाहिजे : तर असे करा भगवान ‘धन्वंतरी’चे पूजन

विश्व भारत ऑनलाईन : आरोग्य हेच सर्वकाही आहे. आरोग्यम् धनसंपदा असे आपण म्हणतो आणि ऐकतो. उत्तम आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे, असा याचा अर्थ होतोय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. भगवान धन्वंतरींना आद्य वैद्य मानले जाते. किंवा आजच्या भाषेत भगवान धन्वंतरी हे या जगातील पहिले डॉक्टर होय. त्यांनाच आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाते. काय …

Read More »

दिवाळी, आज वसुबारस : कृषक संस्कृतीचे महत्त्व सांगणारा पारंपरिक सण

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळसणाची आज वसुबारसने सुरुवात झाली. दिवाळीचा आज पहिला दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत गाईचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे. गायींचा सांभाळ जवळपास सगळ्याच गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, …

Read More »

शिंदे गटातील मंत्री बेपत्ता, राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्यात आलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना गुलाबराव पाटील गायब झाल्याचे म्हटले आहे. जनतेने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

Read More »

स्वप्न नव्हे सत्य : ‘तो’ पत्नीला घेऊन जाणार चंद्रावर

विश्व भारत ऑनलाईन : निवडणुकीवेळी राजकीय मंडळींकडून दिली जाणारी आश्वासने आणि प्रेयसीसमोर भावूक होऊन प्रियकराने दिलेली वचने यामध्ये फरक नसतो! निवडणुकीनंतर पाच वर्षे आणि लग्नानंतरची आयुष्यभराची संसाराची वर्षे त्याला साक्ष असतात. ‘तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर नेईन’… असे एक ना दोन, प्रेमात अशी कितीतरी वचने दिली जातात. स्वप्नही दाखवली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणे काही शक्य …

Read More »

नागपुरातील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्कार

विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्र शासननाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2022 चे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कार अलीकडेच देण्यात आले. यात नागपुरातील सदर, किराडपुरा येथील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर आयोजित करण्यात आला होता. यात 33 जिल्हास्तरीय आणि तीन राज्यस्तरीय मंडळाला पुरस्कार देण्यात आले. त्यात नागपुरातील विजय बाल गणेश …

Read More »

२४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला …

Read More »

मोबाईल खरेदीसाठी ‘ती’ रक्त द्यायला तयार : अल्पवयीन मुलगी पोचली थेट ब्लड बँकेत

  विश्व भारत ऑनलाईन : मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता मोबाईल फोनही गरजेची वस्तू बनला आहे. अनेक दैनंदिन कामे मोबाईलच्या माध्यमातून करीत असतो. हातात महागडा स्मार्टफोन आजकाल स्टेट्स आहे. अगदी शाळकरी मुलेही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. मोबाईल मिळवण्यासाठी मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे. मुलगी पोहोचली …

Read More »

दिवाळीपूर्वी छापेमारी : नागपुरात २० लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थ साठा जप्त

विश्व भारत ऑनलाईन : अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात राबविलेल्या मोहिमेत तब्बल २० लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त केला. नागपुरात १६ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये १० हजार ८८३ किलो वजनाच्या अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत २० लाख १९ हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

यंदा रेनकोट घालून फटाके फोडायचे की, पाऊस माघार घेणार? वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : यंदा पाऊस माघारी जाण्यास विलंब लावतोय. रेनकोट घालून तर दिवाळीत फटाके फोडावे लागणार नाही ना, अशी चर्चा आहे.तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे राज्यातून माघार घेत असल्याने विविध जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता दिसते.त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची …

Read More »

शाळकरी मुलांसारखी केली बैठकीतून हकालपट्टी : विभागीय आयुक्तांविषयी नाराजी

विश्व भारत ऑनलाईन : जे काही करायचे ते रीतसर कागदोपत्री करा, मात्र शाळकरी मुलांसारखी वागणूक आम्हाला नका देऊ, अशी विनंती काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली. घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यासंदर्भात विभाग प्रमुखांची आढावा बैठक मंगळवारी केंद्रेकर यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यात उद्दिष्ट गाठण्यात दिरंगाई केली म्हणून नगर परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त सुनील …

Read More »