कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केली. मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले आहे,असा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर …
Read More »शरीराची थंडी कमी करण्यासाठी काय कराल? वाचा…
थंडी वाढत आहे. थंडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही खास गोष्टी तुम्हाला करता येतील. काही पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील. ✳️हिवाळ्यात बदामाचे दूध पिणेही फायदेशीर असते. बदामाचा प्रभाव उष्ण असतो. हे तुमचे शरीर गरम करेल. बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल. ✳️लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. गरम लिंबू पाणी प्यायल्याने …
Read More »विभागीय आयुक्त कधी देणार अहवाल? भ्रष्ट अभियंता गोडसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘गोड’
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, गोडसेवर अजूनही निर्णय …
Read More »नेत्याच्या मुलाच्या लग्नात 900 जणांना विषबाधा
औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …
Read More »गडकरींनी घटविले 56 किलो वजन : कोणते व्यायाम करतात?
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करून अनेकांना थक्क केले आहे. वजनच नव्हे तर एकूणच गडकरींच्या तब्येतीत सुधार दिसून येत आहे. करोनानंतर गडकरींनी आपल्या जीवनशैलीत केलेले काही बदल त्यांनी सांगितले.135 वरून 89 आणलेलं वजन आणि श्र्वसन संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचे गडकरी सांगतात. पैसे हे जीवनाचं साधन आहे, ध्येय नाही, असं म्हणत गडकरींनी …
Read More »चंद्रपुरात वाघांच्या बंदोबस्तासाठी तहसीलवर मोर्चा
चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले. या गावातील नागरिक …
Read More »विदर्भात दोन दिवस पाऊस : हवेत वाढला गारठा
राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढलाय. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान …
Read More »दिग्गज टेनिसपटूला दोन कॅन्सरचा विळखा
प्रसिद्ध व दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा 12 वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात सापडली आहे. तिला दुहेरी फटका बसला आहे. अर्थात नवरातिलोव्हाला आता स्तन आणि घश्याचा कर्करोग झाला आहे. 66 वर्षीय या टेनिसपटूला 2010 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात केली होती. 18 वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन मार्टिना नवरातिलोव्हाला दुहेरी कॅन्सरमुळे धक्का बसलाय. ती म्हणाली, हा …
Read More »‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे …
Read More »समसमान मत पडल्यास सरपंचांना मतदानाचा अधिकार : उपसरपंच निवडणुकीवर कोर्टाचा निर्णय
उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड यांनी तर औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, …
Read More »
विश्वभारत News Website