Breaking News

विश्व भारत

“डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्यूनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते अलीकडेच पार पडला. नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. …

Read More »

आमदार बच्चू कडूसंदर्भात मोठी बातमी : नागपुराला उपचारासाठी हलविणार

माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात अमरावती येथे झाला आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आहे. अमरावती येथे रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात …

Read More »

नागपुरला येत असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते नागपूर येथील बैठकीला जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना हदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे …

Read More »

आमदार बच्चू कडू यांचा भीषण अपघात, डोक्याला मार

माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या …

Read More »

नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे विद्यार्थ्यांचा कापला गळा

नागपुरात नायलॉन मांजामुळे घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकलीचा अलीकडेच गळा कापला होता.ही घटना ताजी असतानाच परत एकदा मांजामुळे एका युवकाचा गळा कापल्याची घटना समोर आली आहे. शहरातील राणी दुर्गावती चौक परिसरात सायकलने परत येत असताना हा प्रकार घडला. शाहनवाज हुसैन मलिक (वय 18) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला 16 टाके पडले आहेत. पोलिस …

Read More »

“मंत्रीमंडळ विस्तार करा, अन्यथा… “

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने काही आमदार नाराज आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. हा परिवाराचा विषय आहे. नाराजी असून, नसून चालत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या मनासारखे होत नसतं. पण, प्रामाणिक हे आहे की मंत्रिमंडळ विस्तार आता व्हायला पाहिजे, “असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. “शेवटच्या सहा महिन्यात मंत्री बनवतील. महामंडळ …

Read More »

चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. इंगळे यांची नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांच्या नियुक्त्या अलीकडेच करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किशोर इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा सिनेट सदस्य होण्याचा बहुमान डॉ.इंगळे यांना मिळाला आहे. योगदान मोठे… डॉ. इंगळे यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या …

Read More »

बायको बोलत नाही, सुट्टीसाठी पोलिसाचा अर्ज!

एका पोलिसाच महिन्याभरापूर्वी लग्न झालं.लग्नानंतर लगेच तो बायकोला सोडून ड्यूटीवर परतला. त्याने त्याच्या बायकोला वचन दिलं की तो लवकरच सुट्टी घेऊन घरी येईल. मात्र, त्याला सुट्टी मिळत नाहीये. सुट्टी मिळत नसल्याने बायको नाराज झाली. आणि ती माझ्याशी नीट बोलत नाही, असं त्याने पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगितले. बायको बोलेना ‘वारंवार कॉल करतोय पण ती फोन उचलेना आणि फोन उचलला की काहीही …

Read More »

आमदाराला लग्नासाठी साकडे : एखादे स्थळ बघा! तरुणाची मागणी

लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. आता काही तरुणांनी वेगळीच शक्कल लढविली आहे. आमदार साहेब, मी खुलताबाद तालुक्यातील ग्रामीणमधून बोलतोय. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आठ-नऊ एकर जमीन आहे. तरीही इकडे मुली देत नाहीत. तुमच्या तालुक्यात खूप मुली आहे, एखादे स्थळ बघा, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याकडे एका तरूणाने फाेनवरून केली. यामुळे ‘शेतकरी नवरा नको ग बाई’ हा विषय …

Read More »

पोलीस भरतीतील उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे रायगडमध्ये औषधी द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र, त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणती औषधे? …

Read More »