चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीत अग्रेसर आहे. त्यातच आता हा जिल्हा वाघांचे माहेरघर बनला आहे. मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी, सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी पहाटे …
Read More »जय महाकाल : नाशकातील त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून खुले
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन व मंदिराच्या देखभालीसाठी 5 जानेवारीपासून बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ७ पासून खुले होणार आहे. संवर्धनाच्या कालावधीत त्रिकालपूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र, भाविकांना दर्शनासाठी प्रवेशबंद होता. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखर देसर्डा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केलेले चांदीचे दरवाजे गर्भगृहास …
Read More »कोरोनात घोटाळा, उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते. त्याअनुषंगाने कोरोना उपचार आणि क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीने नोटीस बजावल्याची माहिती आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होईल. प्रकरण काय? मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या …
Read More »चंद्रपुरच्या जंगलात थरार : वाघ आणि मादी बिबट्यात झुंज,कोण जिंकले? वाचा…
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोळी बाळापूर वनपरिक्षेत्रांतर्गतमधील गोविंदपूर वनक्षेत्रातील येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ मध्ये मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाघासोबतच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांचा आहे. माहितीनुसार,तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील येनुली मालचे वनरक्षक श्रीरामे गुरुवारी सकाळी गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ६५ मध्ये अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेत आढळली. वाघासोबतच्या झुंजीत …
Read More »आचारसंहितेत नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक
नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. सन २०२३-२४ साठी १ हजार कोटींचा आराखडा नियोजन विभागाने तयार केला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. उपमुख्यमंत्री फडणवीस हे बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ही बैठक घेण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार केला. आयोगाने काही अटी, …
Read More »अमित आणि रितेश देशमुख भाजपच्या वाटेवर?
लातूरचे प्रिन्स राजकुमार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख आणि अभिनेते रितेश देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, लातूर भाजपमधून त्यांच्या नावाला विरोध आहे. अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपत घेणार …
Read More »वनमंत्री मुनगंटीवार यांच्या माजी स्वीय सहायकाला चोपले : नोकरीच्या नावावर लाखो उकळले
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एक पीडिताने लाथा बुक्यांनी मारहाण केली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करत असलेल्या पीडिताकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 लाख रुपये घेतले आहेत. धवणे याने नोकरीच्या नावावर एक लाखापासून तीस …
Read More »नागपुरात 77, औरंगाबादमध्ये 75 विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत 11 जिल्ह्यातील 798 विकास संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. शासनाच्या मागणीनुसार राज्य सहकारी बँकेने विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सुमारे 3 कोटी रुपयांइतकी रक्कम संबंधित विकास संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. सहकारातील त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर संस्थेची भूमिका बजावत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांचा समावेश होतो. कोणत्या …
Read More »दुर्दैवी घटना : नागपुरच्या न्यायालयात लिपिकाला ‘हार्ट अटॅक’
नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे.नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाव्या माळ्यावरील न्यायालयात कर्तव्य बजावत असताना एका लिपिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना बुधवार, दुपारी 3-4 या वेळेत घडली. मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव गणवीर असून 50 वय असल्याचे कळते. गणवीर यांना डॉक्टरकडे नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले.
Read More »नागपुरच्या जिल्हा न्यायालयात पोलिसाने फोडले वकिलाचे तोंड
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यात पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. पाेलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली. संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना …
Read More »
विश्वभारत News Website