मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नागपुरात पतंग शौकीनांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी सकाळपासूनच आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. अबालवृद्ध सारेच पतंग उडविण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उपराजधानीतील प्रत्येक भागात आकाशातील पतंगांच्या गर्दीचे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रत्येक गच्चीवर सकाळपासूनच अख्खे कुटुंब एकत्रित पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. महिला, युवती पतंग उडविण्याची हौस भागविताना दिसत आहे. पतंग उडवितानाच डीजेच्या तालावर नृत्याचाही आनंद घेत …
Read More »महाराष्ट्रातील प्रवासी? विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा अंत
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 72 प्रवासी घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.महाराष्ट्रातील कोणी प्रवासी आहेत का? याचा शोध …
Read More »महिला पोलीस जागीच ठार : दुचाकीची बैलगाडीला धडक
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे दुचाकीची बैलगाडीला धडक बसून झालेल्या अपघातात महिला पोलिस जागीच ठार झाली. सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही दुर्घटना भोकरदन रोडवरील राजूरजवळच्या ठाकूरद्वार हॉटेलसमोर रविवारी सकाळी घडली. सुनीता ढोबाळ आज सकाळी आपल्या मुलासह दुचाकीवरून भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर या मूळगावी जात होत्या. राजूरजवळ त्यांची दुचाकी बैलगाडीला धडकली. सुनीता ढोबाळ …
Read More »सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेठ घेतला. तात्काळ घेतलेल्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत असताना तिथे असलेल्या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Read More »चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू
चंद्रपूरातील भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा रविवारी मृत्यू झालाय. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळला. वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली. माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे,यासाठी जिवंत विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली आहे. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या …
Read More »गडचिरोलीतही शिक्षक भरती घोटाळ्याची पाळेमुळे : चौकशी थंडबस्त्यात
राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीवर बंदी आहे. त्यानंतरही काही शिक्षण अधिकाऱ्यांनी बनावट मान्यतेवर अनेक शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीची परवानगी दिली होती. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबई ते गडचिरोलीपर्यंत असून वरिष्ठांच्या आशीर्वादाने विभागीय चौकशी थंडबस्त्यात ठेवल्याचे चित्र आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नवीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता. …
Read More »नागपुरात गडकरींना धमकी : 100 कोटी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट
१०० कोटी द्या…अन्यथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट करू, अशी धमकी देणारा फोन शनिवारी आला. हा फोन कर्नाटक राज्यातून आला असून ती धमकी कुख्यात डॉन दाऊन इब्राहिमच्या नावावर मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी साडेअकरा ते साडेबारा वाजतादरम्यान सलग तीन धमकीचे फोन आले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ …
Read More »जैन कलार समाज निवडणुकीत घोळ : धर्मादाय कोर्टाची प्रक्रियेवर स्थगिती
नागपुरातील जैन कलार समाज न्यासची निवडणूक अलीकडेच पार पडली. किचकट निवडणूक प्रक्रिया, मतमोजणीतील घोळ व निवडणूक अधिका-यांचे नियमबाह्य वर्तन यामुळे धर्मदाय आयुक्तांनी निकाल प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे. 25 डिसेंबरला जैन कलार समाजाच्या मध्यवर्ती समितीसाठी तसेच जिल्हा समितीसाठी एकूण २६ केंद्रांवर मतदान पार पडले. २६ डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता पाच दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात …
Read More »बावनकुळे येणार : आज मौदातील धानल्यात भाजपकडून सरपंचांचा सत्कार
✍️मोहन कारेमोरे भारतीय जनता पक्षातर्फे मौदा-कामठी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार,14 जानेवारीला दुपारी 12 वाजता मौदा तालुक्यातील धानला या गावात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन होईल. तर, अध्यक्षस्थानी कामठी मौदा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर असतील.अलीकडेच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. यात मौदा तालुक्यातील धानला परिसरात मोठ्या संख्येने …
Read More »पुण्यात घेतली फोन-पेवरून लाच : उद्योग निरीक्षकाला अटक
जिल्हा उद्योग केंद्रातील एका निरीक्षकाने चक्क फोन पे-द्वारे हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर शुक्रवारी त्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. चंद्रभान परशुराम गोहाड (वय.57) असे लाचखोर उद्योग निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी गोहाड याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. प्रकरण काय आहे? फिर्यादी …
Read More »
विश्वभारत News Website