Breaking News

विश्व भारत

जैन कलार समाज निवडणूक : निकालाला कोर्टाची स्थगिती कायम

जैन कलार समाज निवडणूक 25 डिसेंबर रोजी झाली. मात्र निवडणूक मोजणीसाठी तब्बल आठ दिवस लागले. त्यामुळे या निवडणूकीत घोळ झाला आहे, असा दावा विरोधकांनी केला असून धर्मादाय उपायुक्त न्यायालयात दाद मागितली आहे. यावर प्राथमिक सुनावणीत स्थगिती मिळाली. पुन्हा एकदा धर्मादाय उपायुक्तांनी ही स्थगिती 24 जानेवरीपर्यंत कायम ठेवली. जैन कलार समाज न्यासाच्या निवडणूकीत मतमोजणीतील घोळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य वर्तनामुळे धर्मादाय …

Read More »

खऱ्हा न मिळाल्याने आरोपीने फोडले डोके : नागपुरमधील न्यायालयातील प्रकार

खऱ्हा न मिळाल्याने नागपूर जिल्हा न्यायालयात आरोपीने स्वतःचे फरशीवर डोके फोडले. सागर बोरधरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सध्या खटला सुरु आहे. तो नागपूर कारागृहात कच्चा कैदी म्हणून आहे. त्याची शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजेरी होती. त्यावेळी त्याला न्यायालयात खालच्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. कुणालातरी त्याने खऱ्हा मागितला. मात्र, त्याला खऱ्हा मिळाला नाही. अखेर …

Read More »

शिंदे गटाच्या आमदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ

शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट शिंदे गटावर नाराजी व्यक्त केल्याने ते पुन्हा ठाकरे गटात जाणार का यावर चर्चा रंगली होती. आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची कबुलीही दिली. यावेळी गायकवाड म्हणाले की, मला मुंबई मंत्रालय येथून एक फोन …

Read More »

जमिनीच्या वादातून महिला नायब तहसीलदारास मारहाण

बीड जिल्ह्यातील केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार, दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्‍या. यावेळी त्यांना एका कारमधून त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ व सुरेखा यांचा भाऊ हरिदार भास्कर महाले व …

Read More »

पार्किंगच्या वादात नागपुरात तरुणाचा खून

घरासमोर वाहन पार्क केल्याने दोन गटात वाद विकोपाला गेला. यात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात घडली. घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने (वय 19) असे आहे.तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण …

Read More »

शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा अपघात

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला. शुक्रवार,सकाळी 11.40 वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका येथे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. सावंत हे या अपघातात जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल …

Read More »

कर्मचाऱ्यांना धक्का!टायपिंग येत नसल्यास वेतनवाढ रोखणार

तुम्ही शासकीय नोकरीवर आहात आणि तुम्हाला संगणक टायपिंग येत नसेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. राज्यातील विविध विभागातील लिपिकांना टायपिंग येत नसल्याचे दिसून आले आहे. अशांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्णय काढले आहेत.इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र असेल तर त्या लिपिकाला नियुक्ती दिनांकापासून 4 वर्षात मराठी टायपिंगचे किमान 30 …

Read More »

अनिल देशमुख घेणार नागपुरात फडणवीसांची भेट!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच नागपूरचा दौरा करणार असल्याचे कळते. “सध्या उच्च न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या काटोल मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. शिंदे, फडणवीसांची घेणार भेट “मुख्यमंत्री …

Read More »

तरुणाच्या फुप्फुसात अडकली सुई आणि…

जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले. जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली …

Read More »

रेल्वेमंत्री दानवेंचे दुर्लक्ष!शेतजमीन संपादनाचा मुद्दा: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प थंडबस्त्यात

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भवितव्य तूर्तास अधांतरी आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या हरकतीनंतर प्रकल्प आहे तसाच पुढे सुरु ठेवणे अथवा रेल्वे मंत्रालयानुसार बदल करून पुन्हा नव्याने डीपीआर सादर करणे असे कोणतेही काम मागील 3 महिन्यांत झालेले नाही.मागील 3 महिन्यांपासून प्रकल्पाची फाईल दिल्लीत रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडून आहे. संपादन आणि शेतकरी …

Read More »