अभिनेत्री ऐंद्रिला शर्माला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऐंद्रिला शर्माला हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला अचानक स्ट्रोक आल्याने मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. त्यानंतर अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकारी लक्ष देईना : पुराव्यासह आमदाराची तक्रार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र,मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे एक महिन्यापासून जिल्हा उपनिबंधकांनी आदेश डावलून प्रशासकाची नेमणूक केली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा उपनिबंधकांविरोधात पुराव्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता सहकार विभागाकडून जिल्हा उपनिबंधकावर काय कारवाई करण्यात …
Read More »मटण सूपमध्ये भात का?मारहाणीत वेटरचा मृत्यू
मटणाच्या सूपमध्ये भात का दिलाय,तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असे प्रश्न विचारत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत वेटर गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात घटना घडली आहे. माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत …
Read More »11 दुचाकी, ऑटो चोरणाऱ्यांना अमरावतीत अटक : वाचा नागपूर कनेक्शन…
अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय आहेत. पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येताच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने सूत्रे हलवत तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त केले. त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मंगवारी गस्त घालत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की,दोन व्यक्ती चित्रा चौकात …
Read More »शिवसेनेने बेईमानी केली, आम्ही जागा दाखवली
शिवसेनेसोबत २०१४ मध्ये युती करायला तयार होतो. मात्र अवघ्या चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. युती तोडल्यानंतर ११८ जागांवर लढणारा भाजप एका दिवसात २८८ जागा लढायला तयार झाला. त्याचं एकमेव कारण होते ते म्हणजे अमित शाह. अमित शाह हे आपल्यासोबत होते. दोन महिने अमित शाह महाराष्ट्रात येऊन राहिले. निवडणुकीचे तंत्र त्यांनी आपल्याला शिकवले,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेने …
Read More »‘महसूल’ची डोकेदुखी : विधान परिषदेचे अर्ज अर्धवट; नागरिकांना फोन करून कागदपत्रांची मागणी
विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधरांनी ऑनलाईन दाखल केलेले अनेक अर्ज अर्धवट आहेत. त्यामुळे महसूल खात्याची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना फोन करुन कागदपत्रे मागविली जात आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,नागरिकांनी अर्ज देताना पुरक कागदपत्रांचे स्कॅनिंग केले. परंतु त्यातील बहुतेक तपशिल उमटले नाहीत. ते तपशिल जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतत फोन करुन त्यांच्याकडून माहिती मागविली जात आहे.अमरावती तहसील …
Read More »पोलीस भरतीसाठी सराव करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू
वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. …
Read More »वाहनातील धुळीमुळे डोळ्यांना त्रास, अशी घ्या काळजी…
नागपूर, अमरावती, अकोला यासह अनेक शहरातील प्रमुख वर्दळीच्या विविध भागातील रस्त्यांवर उठणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे दुचाकीस्वार, वाहनचालक आणि रस्त्याच्या शेजारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी समोर येत आहे. सततच्या धुळीमुळे दमा, शिंका येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काय करावे? विविध शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी धूळ …
Read More »नागपुरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ
नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. …
Read More »मंत्री कमी अन् बंगले जास्त : मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, नागपूर हिवाळी अधिवेशन
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या तरी दोन आठवड्यांची कार्यक्रम पत्रिका तयार झाली आहे. अधिवेशन म्हटले की रविभवन येथील काॅटेज मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ लागते. ज्येष्ठनेनुसार बंगले मिळावे यासाठी प्रसंगी रूसवे फुगवे, मानापमानही होतात. उपमुख्यमंत्र्यांना “देवगिरी’ हा बंगला दिला जातो. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हा बंगला मिळेल. कॅबीनेट मंत्र्यांसाठी रविभवन आणि राज्यमंत्र्यांसाठी नागभवन आहे. …
Read More »
विश्वभारत News Website