एका बँकेतील गलेलठ्ठ पगाराच्या पदावरून निवृत्त झालेल्या 80 वर्षांच्या आजोबांनी डेटिंग साईटवरील ललनेच्या जाळ्यात अडकून एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 17 लाख 10 हजार रुपये गमावले आहेत. आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रेया नावाच्या महिलेवर पुण्यातील वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी आजोबा हे वारजे-माळवाडी परिसरात राहतात. त्यांचा पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. …
Read More »मोबाईल : इंटरनेट सुरु ठेवून झोपताय ? गंभीर आजारांचा धोका
तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन सुसह्य आणि बदलले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या जाणून घेण्यासोबतच तुम्ही लोकांशी त्वरित संपर्क साधू शकता. याशिवाय तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. इंटरनेटच्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे न थांबता सतत मनोरंजनाची सुविधाही मिळाली आहे. पण त्याचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. वाय-फाय आणि मोबाईलचा सतत वापर केल्यामुळे आणि बहुतेक वेळा त्याच्या रेंजमध्ये राहिल्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. डोळ्यांवर परिणाम मोबाईल …
Read More »तहसीलदार दोन लाख, तर अमरावतीच्या मुख्याधिकारी २० हजार घेताना अटकेत
तब्ब्ल दोन लाखांची लाच घेतल्याने अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली. मिनल कृष्णा दळवी असे अटक केलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. दुसरी घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य …
Read More »मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस : मराठवाडा, विदर्भ?
दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ,तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीस राज्यात असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता …
Read More »मोबाइलचे व्यसन कसे सोडवाल ? वाचा 3 टिप्स…
पदोपदी काय घडतंय, याची क्षणाक्षणाची बातमी मोबाईलवर पाहायला मिलते.जगातील २ कोटीहून अधिक लोक मोबाइल आणि सोशल मीडियाचे व्यसनी आहेत. भारतीय लोक दररोज सुमारे पाच तास मोबाइलवर घालवतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या व्यसनाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. अना लेम्बके सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्यासाठी ३ मार्ग सुचवतात. ✳️‘स्क्रीन फास्ट’ करा स्क्रीन फास्ट म्हणजे मोबाइलपासून …
Read More »सीताफळातील गोडवा हरवला : उत्पादन निम्म्यावर ; दर्जाही घसरला
पावसाचा विपरीत व एकत्रित परिणाम झाल्याने सीताफळ उत्पादन निम्म्यावर आले असून दर्जाही घसरला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत चांगला दर मिळाला. पण अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली. करोनामुळे मागील दोन हंगाम आणि पावसामुळे यंदाचा, म्हणजे सलग तीन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. माहितीनुसार, राज्यभरात सुमारे एक लाख हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. डोंगर-दऱ्या, नदी, ओढय़ांच्या काठावर, …
Read More »नागपूर : ओला दुष्काळ,स्वतंत्र विदर्भासाठी उद्या गडकरींच्या कार्यालया पुढे आंदोलन
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवार,११ नोव्हेंबरला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणात येणार आहे. गडकरी यांच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलसमोरील कार्यालयावर जाणारा मोर्चा शुक्रवारी दुपारी १२ वाजता छत्रपती चौक, एनआयटी गार्डन, सावरकर नगर येथून निघणार आहे, तसेच खासदार कृपाल तुमाने यांच्या भांडेप्लॉट चौक , उमरेड रोड येथील कार्यालयावर …
Read More »शिंगाडे : कॅन्सर,ऍसिडिटी,त्वचेच्या समस्या होतील दूर आणि बरेच काही…
गुलाबी थंडी वाढतेय. लोकांना हिवाळा तसाही खूप आवडतो. या ऋतूमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. हिवाळ्यात शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनटचा आनंद घेणे कोणाला आवडत नाही. पाण्यात उगवणारी ही भाजी चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया शिंगाड्याचे फायदे… शिंगाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरी कमी आणि न्यूट्रिशन जास्त आहे. तसेच हा फायबरचा चांगला स्रोत आहे. …
Read More »चिंतेत भर : सरावादरम्यान विराट कोहली जखमी!
रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्याचा उजवा हात दुखावला होता. मात्र, रोहितने मी पूर्णपणे तंदुरुस्त असून मला दुखापत झाली होती, मात्र आता मी बरा असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. पण आता रोहित नंतर संघाचा प्रमुख खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त समोर आले. रोहितनंतर विराट कोहली अॅडलेडमध्ये सराव करताना जखमी झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने फेकलेला चेंडू विराटच्या …
Read More »आजपासून आचारसंहिता लागू : थेट सरपंच पदांसाठी 18 डिसेंबरला मतदान
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,तसेच नव्याने …
Read More »
विश्वभारत News Website