Breaking News

विश्व भारत

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती

गायरान जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई तूर्तास थांबवली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबतची सूचना देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संपूर्ण राज्यभरातच ही कारवाई थांबवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याबाबतचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.गायरान जमिनी या प्रामुख्याने जनावरांच्या चार्‍यासाठी …

Read More »

नागपूर विद्यापीठात खळबळ! लैंगिक छळ आणि १६ लाख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचे बोलून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. काय आहे …

Read More »

तुमची किडनी कशानी खराब होते? घ्या जाणून

किडनी निरोगी असावी, यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे, ज्याचा वापर करून तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. घरी शिजवलेले अन्न खा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. याशिवाय अशा काही सवयी आहेत ज्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते, चला जाणून घेऊया…कोणती आहेत मुख्य कारणे… १) मिठामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते. याचे …

Read More »

लाभदायक काय : औषधं की व्यायाम? व्यायाम केल्यास तणावात घट!

औषधं घेण्याचा कंटाळा येतोय, असे शब्द कानावर पडतात. त्यामुळे व्यायाम करणे कधीही उत्तमच. मानसिक आराेग्याच्या समस्यांना ताेंड देणाऱ्यांनी व्यायाम केल्यास त्यांच्यातील निराशेत घट होण्याची शक्यता असते. सायकियाट्रिक रिसर्चमध्ये प्रकाशित एका संशाेधनात हा दावा केला आहे. मानसिक आराेग्याची समस्या असलेल्या लाेकांनी दरराेज ३० मिनिटे शारीरिक व्यायाम केला. त्यानंतर त्यांना नैराश्याचा त्रास कमी झाल्याचे जाणवले. फेबियन डी लेग्रांड व त्याच्या टीमने १८ …

Read More »

पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय कराल?

अनेकांची समस्या ही बेली फॅट असते. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करीत असाल मात्र त्याचा काहीही फायदा होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्सची माहिती देणार आहोत… ✳️रोज 12 सूर्यनमस्कार करावे सूर्यनमस्कार हा हार्मोनल बॅलन्स, चयापचय आणि आतड्यांद्वारे पोषक द्रव्यं शोषण्यास मदत करण्यासाठी व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे. हे मानसिक आरोग्य, झोप …

Read More »

बच्चू कडू कोणत्या खात्याचे होणार मंत्री? वाचा…

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यांची मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केलीय. त्यामुळे अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरात आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून भन्नाट डान्स केला. यावेळी दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची …

Read More »

डेंग्यूने बालकाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील घटना

औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा गावात आठवडाभरापासून अज्ञात तापाची साथ आहे. मंगळवारपासून तापाने फणफणलेल्या प्रणव प्रेमसिंग चव्हाण या अकरा वर्षीय बालकाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जळगावच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. डेंग्यूने या बालकाचा मृत्यू झाल्याचे अहवालावरून दिसून येते. याबाबत सोयगाव तालुका आरोग्य विभागाने दुजोरा दिला. जंगला तांडा येथे तालुका आरोग्य विभागाच्या पथकान ताप आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले. यातून मृत बालकाच्या कुटुंबातील मानवी …

Read More »

‘पीडब्ल्यूडी’च्या कामात 25 लाखांची फसवणूक

सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सचिन साळुंके,रा. आंबेगाव, कात्रज याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. समीर शशिकांत रहाटे (वय 46, रा. मुलुंड) यांनी फिर्याद दिली. समीर यांची एस. आर. ग्लोबल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. त्यांनी या कंपनीच्याच नावाने पीडब्ल्यूडीचे काम करण्याचे लायसन्स काढले आहे. लायसन्स काढल्यानंतर कामे मिळविण्यासाठी …

Read More »

“आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा…”

“मुलांसाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आयुष्याला समृद्ध करतात. आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा,”असे भावनिक आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्त कीर्तनकार कांचनताई जगताप यांनी केले. या वेळी विजय औताडे यांनी त्यांच्या आई कै.अनिताताई साईनाथ औताडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भगवानबाबा बालिकाश्रमातील २० मुलींना दत्तक घेतले. हर्सूलचे ग्रामदैवत हरसिद्धी माता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात जगताप बोलत होत्या. “जन्माला येणे …

Read More »

पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का

उत्तराखंडमधील आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे. औषधं कोणते? पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या …

Read More »