Breaking News

Vishwbharat

शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध

चंद्रपूर : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल.                                        …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…देशाच्या राजकारणात मागील तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 …

Read More »

प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवावा : डॉ. नितीन राऊत

नागपूर: कोरोना नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरले असले तरीही लॉकडाऊनच्या काळात झालेल्या चुका टाळून प्रशासकीय यंत्रणेने योग्य समन्वय ठेवावा. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. त्यातून जनतेचा यंत्रणेवरील विश्वास वाढेल, त्यांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास जनतेचे सहकार्य लाभेल. सुरुवातीला नियंत्रणात राहिलेला कोरोना नंतरच्या काळात झपाट्याने वाढत असून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या.      …

Read More »

सार्वजनिक उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा : गृहमंत्री

नागपूर : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.          …

Read More »

पावस…KavyaSuman

तुझ्या संगती प्रिय पावस रुसला का रे सख्या……मन भावन रुसला का मी ही होते तुझीच तुझी कोसळल्या सरी अन् सरी थेंबात दाटे आठवणी किती श्वास विसरला प्रीतगाणी का रे सख्या……मन भावन रुसला का मन माझे बहरात न्हाले आभाळ धुंद भरून आले मोहरली ऋतू पालवी शहारली पाठी पेटला वणवा का रे सख्या……मन भावन रुसला का ओलीचिंब अवघी धरणी अवनी उमलली मृत्तिका …

Read More »

ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना भरीव निधी

मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधित निधी काल प्राप्त झाला आहे. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित केला जाईल. यापूर्वी इतक्याच रकमेचा अबंधित निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या आयोगाचा आतापर्यंत 2 हजार 913 कोटी 50 लाख इतका निधी प्राप्त झाला आहे, …

Read More »

जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या १५ टक्क्यांच्या मर्यादेत

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कोविड-१९ च्या प्रादुभार्वामुळे या वर्षाच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या सामान्य प्रशासन विभागाच्या ७ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या …

Read More »

आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ १ जुलैपासून

मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला १ जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला होता.      …

Read More »

विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत

नागपूर : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपतत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.                                                …

Read More »

बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार

मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या यंदाच्या इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. ‘कोरोना लॉकडाऊन’मुळे निकाल उशिरा जाहीर होत आहे. मागीलवर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. यावर्षी एकूण 15 …

Read More »