Breaking News

Vishwbharat

छत्तीसगड सरकार ‘या’ साठी शेण खरेदी करणार

रायपूर : छत्तीसगड सरकार मोठ्या प्रमाणावर शेण खरेदी करणार असून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज हरेली सणाच्या मुहूर्तावर गोधन न्याय योजनेला सुरुवात केली आहे. अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेणारे छत्तीसगड देशातील पहिले राज्य ठरले आहे. माहितीनुसार, सरकार पशुपालकांकडून 2 रुपये किलो दराने शेण खरेदी करणार आहे. या शेणाच्या मदतीने जैविक खत तयार केले जाणार आहे. पशुपालनाला प्रोत्साहन देणे आणि शेतजमिनीचा कस …

Read More »

मास्क, सुरक्षित अंतर अनिवार्य : गृहमंत्री 

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. अर्थ व्यवस्था बळकट व्हावी व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी अनलॉक प्रक्रिया सुरु आहे. मात्र नागरिक निर्देशांचे पालन करत नाहीत ही खेदाची बाब असून गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या. काटोल उपविभागीय …

Read More »

इंटीग्रेटेड, स्क्रिनिंग आणि स्वॅब कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपुरात

नागपूर : प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेने कोरोनाचे संकट ओळखून अत्याधुनिक दजार्ची इंटीग्रेटेड स्क्रिनिंग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपूरकरांच्या सेवेसाठी दिली आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. विभागीय आयुक्तकार्यालयाच्या प्रांगणात श्री.राऊत तसेच श्री.पटोले यांनी व्हॅनची फीत कापून आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेचे …

Read More »

नक्षलभागातील कृषिपंपांना वीज पुरवठ्याबाबत मोठा निर्णय

नागपूर : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषिपंपांना16 तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊजार्मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत विभागाच्या अधिकाºयांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यासह सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रंगारी, गोंदिया परिमंडळाचे श्री. शिरकर, महापारेषणचे संचालक रमाकांत मेश्राम उपस्थित …

Read More »

ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या …

Read More »

पाच हजार तरुणी होणार सायबर सखी 

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5000 महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.                  …

Read More »

शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार :  मुख्यमंत्री

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या …

Read More »

दूध दराबाबत उद्या मंत्रालयात बैठक

मुंबई: दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारला दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे.                                                                                …

Read More »

संज्या : अगं इतकं चिडायला…Tapori Turaki

ईमोजी : शिंक किंवा खोकला आला की, असं वाटतं… नमोजी : क्काय? ईमोजी : देवानं आपली फाईल हातात घेतली की काय… *** बन्या : कुलूप सापडलं नाही… मन्या : मग बन्या : मग काय, दरवाज्यावर कोविड-19 बाधितची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला… *** संज्या : अगं इतकं चिडायला काय झालं? छावी : इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही, …

Read More »

आसामात महापूर, मृतकांची संख्या 110

गोहाटी : मागील तीन ते चार आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामात पुरासंबंधित  [aasam flood] दुर्घटनांमध्ये मृतकांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय घरे, शेतपिके, रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती, पाळीव आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 30 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुराचा सर्वांधिक परिणाम 4.53 लाख …

Read More »