Breaking News

Vishwbharat

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम 

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम  मुंबई- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. सध्याचे निर्बध …

Read More »

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू ब्रम्हपुरी,  तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना बुधवार, 12 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा बिटातील कक्ष क्रमांक 1178 मध्ये हा बिबट मृतावस्थेत आढळला. कुडेसावली येथील नागरिक बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले असता, त्यांना दुर्गंधी आली. नागरिकांनी घटनास्थळ परिसरात पाहणी केली असता, …

Read More »

रमजान ने कोरोनावर मात केली.

रमजान ने कोरोनावर मात केली.  जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा, गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले. माणुस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण …

Read More »

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज        दिल्ली, 13 मे, 2021: “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »

पारधी आदीवासी समाजातील चार व्यक्तींवर लावलेले खोटे गुन्हे मागे घ्या -शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम

पारधी आदीवासी समाजातील चार व्यक्तींवर लावलेले खोटे गुन्हे मागे घ्या-शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम  आधारशून्य कार्यवाही करून गुन्हे कबूल करण्यास पोलिसांची सक्ती वरोरा-  वरोरा पोलीस स्टेशम अंतर्गत येवती परिसरातील जंगलामध्ये पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून मोहफुलांची गावठी दारू साठा जप्त केला.परंतु,दारू साठ्याजवळ कोणत्याही आरोपीला अटक न करता व कोणतीही चौकशी न करता आणि दारुसाठयाशी व दारू प्रकरणाशी कसलाही संबंध नसतांना …

Read More »

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने Ø पोर्टल वरील माहिती अद्यावत करण्याच्या दिल्या सूचना Ø हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करा चंद्रपूर, दि.13 मे : जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना आली नसली तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारीत रहावे . आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा उभ्या …

Read More »

‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट’ पोर्टलवर नोंदणीसाठी आधारलिंक मोबाईल व ओटीपीची गरज नाही –  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट’ पोर्टलवर नोंदणीसाठी आधारलिंक मोबाईल व ओटीपीची गरज नाही –     जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि.13 मे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता गंभिर रूग्णांना बेडच्या शोधात विविध रूग्णालय फिरावे लागू नये, त्यांना ऑक्सीजन, आय.सी.यु. किंवा व्हेंटीलेटरचे बेड मिळून रूग्णांची यथायोग्य सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेवून ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. कोविड …

Read More »

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित   45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित   45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस चंद्रपूर दि.13 मे : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार  दि. 14 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता सुरू असलेले कोविड-19 लसीकरण पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तर  45 वर्षावरील नागरिक, हेल्थ केअर वर्कर व फ्रन्टलाईन वर्कर याचे लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. जिल्ह्यात …

Read More »

गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू

गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू Ø आतापर्यंत 62,751 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,255 चंद्रपूर, दि. 13 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 835 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 27 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 198 …

Read More »