पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून …
Read More »नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग : 6 विद्यार्थ्यांवर कारवाई
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात (मेडिकल)सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रॅगिंग प्रकरणी सहा सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हा रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग घेतल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशीप करणारे सिनियर्स आहेत. काही दिवसांपूर्वी सदर रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार …
Read More »पंतप्रधान मोदी जानेवारीत येणार नागपूरला
भारतीय विज्ञान परिषदेचे दहावे आयोजन नागपुरात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमान पदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होईल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकाता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन भारतातील …
Read More »शेतकरी चिंतेत : संत्र्याचे भाव गडगडले : कारण काय… वाचा
बांगलादेशने शुल्कात वाढ केल्याने विदर्भातील एकूण संत्री उत्पादनाच्या ३५ टक्के माल आयात करणाऱ्या निर्यातीला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा संत्र्याचे भाव गडगडले आहेत. अतिवृष्टीतून वाचलेल्या संत्री बागा फळांनी लगडल्या असल्या तरी निर्यात घटल्याने विदर्भातील संत्री उत्पादक आणि निर्यातदार हवालदिल झाले आहेत. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी केली जात आहे. बांगलादेशच्या …
Read More »नागपुरात अपहरण? ‘मित्रासोबत जात आहे’ असे सांगून मुलगा गेला घरातून निघून
विश्व भारत ऑनलाईन : ‘मित्रासोबत जात आहे’ असा मेसेज आईच्या मोबाईलवर टाकून बँगेत कपडे घेऊन मुलगा घरून निघून गेल्याची घटना नागपुरात घडली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.आई वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. आई वडिलांनी मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु आढळून न आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाचे वय 17 वर्ष 9 महिने आहे. मुलगा सोबत मोबाईलही …
Read More »भाजप चिंतेत?: नागपूर जिल्हा परिषदेवर सुनील केदारांचे वर्चस्व
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे या अध्यक्षपदी निवडून आल्या. भाजपलाही सुनील केदार यांचे वर्चस्व रोखण्यात यश आलेले नाही. परिणामी, भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. यातून सुनील केदारांची ग्रामीणमध्ये पकड किती मजबूत आहे याची प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून …
Read More »मोह आवरेना : अंबाझरी तलावात पोहताना मुलाचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर शहरातील अंबाझरी तलावावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या १२ वर्षीय मुलाला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्या मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. शौर्य तुकाराम कोहळे (१२, रा. लोखंडेनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. गेल्या १० महिन्यांतील अंबाझरी तलावातील हा बारावा बळी आहे. शौर्य हा शनिवारी दुपारी दोन वाजता वस्तीतील चार मित्रांसह अंबाझरी तलावावर गेला होता. चौघेही पाण्यात …
Read More »अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पण संधीही द्यावी ; उपमुख्यमंत्री फडणवीस
विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोग्य विभागात अकाऊंटिबिलिटीची गरजेची आहे. सरकार बदलले आहे. त्यामुळे अकाऊंटिबिलिटी ठरली पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्यक आहे. …
Read More »नागपुरच्या धर्तीवर औरंगाबादेत मेट्रो धावणार … वाचा सविस्तर
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मेट्रोचा कायापालट करणाऱ्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्लीत भेट घेत औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालासंबंधी सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे महामेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर… डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत …
Read More »नागपुरात मालगाडीवरून सेल्फी घेताना मुलगा होरपळला
विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये …
Read More »