Breaking News

प्रशासन

बाबुंना पाहिजे चहापाण्याचा खर्च, पत्नीपेक्षा अधिकाऱ्यांचे फाईलवर जास्त प्रेम – नितीन गडकरींची टीका

विश्व भारत ऑनलाईन : एक फाईल पुढे सरकायला दीड वर्ष लागतात. प्रत्येक टेबलवरील शासकीय बाबू चहापाण्याचा खर्च मागतो. आर्थिक व्यवहाराशिवाय काम होतच नाही. शासकीय कामात वेळेचे पालनच होत नाही, असे रोखठोक मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. ते नागपुरात बोलत होते.काही अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात. वनविभागाकडे विकासकामाशी संबंधित 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून …

Read More »

बिनशेती परवानगी ऑनलाईन होणार, तर गुंठेवारीवरही लवकरच धोरण : महसूल मंत्री

विश्व भारत ऑनलाईन : बिनशेती परवानगी (एनए अ‍ॅक्ट) आणि गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. तसेच यात बेकायदेशीर प्रकारही होत आहेत. त्यामुळे या सर्व बाबी टाळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी शासन धोरण निश्चित करणार असून, एनए परवानगी देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नाशिक दौर्‍यावर आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार …

Read More »

817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …

Read More »

तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; टिप्पर, ट्रॅक्टर साेडण्यासाठी मागितले पैसे

विश्व भारत ऑनलाईन : गिट्टीची वाहतूक करताना जप्त टिप्पर आणि ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करु द्यावी यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे(४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली. तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी …

Read More »

भाजप नेत्यांची तक्रार भोवली?, औरंगाबाद जिल्हाधिकारी यांची बदली…आणखी 20 आयएएसच्या बदल्या…

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे सरकारचे पाठबळ असतानाही औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाल्याने सर्वाना आश्यर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महसूल कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. तर, काही भाजपच्या नेत्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चव्हाण यांच्याविरोधात फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. तर, बरेच कर्मचारी आणि अधिकारी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज होते. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील …

Read More »

वाळूमाफियाने तहसीलदारांच्या बंगल्याला ठोकले कुलूप

विश्व भारत ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील वरुडचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे गुरुवारी त्यांच्या शासकीय बंगल्यात होते. रात्री अज्ञाताने त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य दरवाज्याला बाहेरुन कुलूप लावून घेतले. हा प्रकार तहसीलदार मालठाणे यांना शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिस बंगल्यावर पोहोचले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने वरुडमध्ये चांगलीच …

Read More »

भूमाफिया सक्रिय : शासकीय जमिनींवर दोन लाख अतिक्रमणे

विश्व भारत ऑनलाईन : राज्य सरकारची चक्क १० हजार ८९ हेक्टर जमीन अतिक्रमणांखाली अडकली आहे. त्यावर तब्बल दोन लाख २२ हजार १५३ बेकायदा बांधकामे असल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटवण्याची कारवाई कशी करणार याचा स्पष्ट आराखडाच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पण संधीही द्यावी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोग्य विभागात अकाऊंटिबिलिटीची गरजेची आहे. सरकार बदलले आहे. त्यामुळे अकाऊंटिबिलिटी ठरली पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक आहे. …

Read More »

वाळू तस्करी : तर तलाठी,मंडळ अधिकारी, तहसीलदार निलंबित

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील बऱ्याच भागात वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत असते. लिलाव बंद असताना नियमबाह्य वाळूची चोरी होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच मंत्री विखे-पाटील यांनी केले. ज्या भागातून वाळू चोरी केली जाते,त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात …

Read More »

पीडब्लूडीत अजब प्रकार : पदोन्नती मिळाली, नियुक्तीही मनाप्रमाणे द्या, बदल्या कधी?

विश्व भारत ऑनलाईन : पीडब्लूडीमध्ये काही उपविभागीय अभियंत्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, पदोन्नती मिळाली त्याच ठिकाणी बदली व्हावी, यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे हा घोळ वाढत असून पीडब्लूडीतील काही अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. 4-5 महिने पदोन्नतीला होऊनही रुजू होण्यास काही अभियंते अनुत्सुक असल्याचे कळते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न आहे. बदल्यांचे प्रकरण …

Read More »