चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. आमदार जयकुमार गोरे यांची …
Read More »राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीस विधिमंडळात काय म्हणाले…
देशभरातील कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही राज्य सरकारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशी मागणी पुढे आली. मात्र,अधिवेशनाच्या विधिमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली असून ही योजना लागू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘जुनी पेन्शन योजना लागू …
Read More »मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या नागपुरात : समृद्धी महामार्गाची करणार पाहणी
पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून …
Read More »राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती
राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …
Read More »धक्कादायक : ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेले
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली.तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. घटना कशी घडली? खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. …
Read More »पालघरमध्ये पहाटे चार वाजता भूकंपाचे धक्के
पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज २३ नोव्हेंबरला पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. सन २०१८ साला पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा …
Read More »शॉक! वीज बिल आणखी महाग होणार
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला मोठा शॉक मिळण्याची शक्यता आहे. वीज आणखी महाग होऊ शकते.दरवाढीसाठी महावितरणने गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली. यात वीज दरवाढीचा प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा वीज दरवाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा विद्युत बिलावर दिसून येणार आहे. महागाईत आता वीज बिलाचा ‘शॉक’ बसणार आहे. वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरणला …
Read More »दिवाळीत ट्रॅव्हल्स, रेल्वे फुल्ल : तिकीट दरही दुप्पट
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होत असते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या …
Read More »विजेचा धक्का : ४ भावांचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : विद्युत वाहिनीचा जोराचा धक्का लागून आंघोळीला गेलेल्या ४ सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येठेवाडीच्या वांदरकडा परिसरातील नाल्याच्या काठावर आज शनिवारी दुपारी घडली. दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ८), ओमकार अरुण बर्डे (वय ७, सर्व रा. येठेवाडी नांदूर खंदरमाळ) …
Read More »भूमाफिया सक्रिय : शासकीय जमिनींवर दोन लाख अतिक्रमणे
विश्व भारत ऑनलाईन : राज्य सरकारची चक्क १० हजार ८९ हेक्टर जमीन अतिक्रमणांखाली अडकली आहे. त्यावर तब्बल दोन लाख २२ हजार १५३ बेकायदा बांधकामे असल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटवण्याची कारवाई कशी करणार याचा स्पष्ट आराखडाच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत …
Read More »
विश्वभारत News Website