Breaking News

राज्य

यवतमाळ-मुंबई बसला आग : नाशिकमधील घटना : चिमकुल्यासह 12 जणांचा बळी

विश्व भारत ऑनलाईन : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू …

Read More »

निवडणूक आयोगाचे ठाकरेंना पत्र, उद्या दुपारी 2 पर्यंत उत्तर द्या

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे …

Read More »

ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …

Read More »

बंदद्वाराआड फडणवीस-पटोले भेट…भुवया उंचावल्या

विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंदद्वाराआड 20 मिनिट भंडाऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात पटोले आणि फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोमवारी फडणवीस भंडारा दौऱ्यावर होते. त्यात बैठकही झाली. मात्र, अन्य आमदार बाहेर पडल्यावर फडणवीस आणि पटोले यांच्यात चर्चा झाली. ही राजकीय …

Read More »

धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण? गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

विश्व भारत ऑनलाईन : धनगर समाजाचे खरे वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार आहेत,अशी जहरी टीका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसऱ्या मेळाव्यात तूफान फटकेबाजी केली. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी झाली पाहिजे, असे विविध मुद्दे मांडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यावर भाषणादरम्यान जोरदार टीका केली. दरम्यान …

Read More »

भाजपमध्ये शिक्षक आमदारकीसाठी नागपुरातून कोणती नावे चर्चेत?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कधी काळी नितीन गडकरी यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उभे करुन भाजपच्या गडावर कब्जा केला होता. आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी …

Read More »

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल… वाचा काय आहे प्रकरण…

  विश्व भारत ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, असे विधान केले होते. त्यानंतर आता छगन भुजबळ आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम …

Read More »

शेतकऱ्यांवर दिशाभूल करणाऱ्या सहसचिवाला मंत्र्याचा झटका… विदर्भाशी कनेक्शन काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच हायव्होल्टेज झटका दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहसचिवाने हेतूपरस्परपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचेही फर्मान चव्हाण यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही …

Read More »

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 44 आणि भारतीय वन सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याची प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातही बदली सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बदली झालेले पोलीस उप आयुक्त, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक …

Read More »

44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : भीमनवार नवे परिवहन आयुक्त- उस्मानाबाद, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बदली

विश्व भारत ऑनलाईन : सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रशासकीय सेवा(आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त पदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. …

Read More »