विश्व भारत ऑनलाईन : नाशिकच्या जगप्रसिद्ध सप्तशृंगी गडावर सध्या जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांची गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावातच रोखून ठेवलं आहे. तर, यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. खरंतर सध्या नवरात्र सुरु आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी जमणं हे साहजिकच आहे. पण आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणारा अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय वाघमारे असे त्याचे नाव आहे. तर, हॉटेलचे बील द्यायचे नव्हते त्यामुळे त्याने बनाव केल्याचा दावा केल्याचे कळते. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …
Read More »धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण? गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
विश्व भारत ऑनलाईन : धनगर समाजाचे खरे वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार आहेत,अशी जहरी टीका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसऱ्या मेळाव्यात तूफान फटकेबाजी केली. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी झाली पाहिजे, असे विविध मुद्दे मांडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यावर भाषणादरम्यान जोरदार टीका केली. दरम्यान …
Read More »अतिक्रमण – वनविभागाचा दबाव ? : शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
विश्व भारत ऑनलाईन : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी गंभीर आहे.गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जागेवर १९८४ पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. १) वनअधिकारी व …
Read More »आमदार अस्वस्थ : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास सरकार कोसळणार?
विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे दिपक केसरकर हे अजून दोन वर्ष शिक्षण मंत्री राहतील, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पाटील यांनी हे विधान करून राज्यातील शिंदे सरकार दोन वर्ष टिकणार असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत वेगळीच भविष्यवाणी केली आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी …
Read More »जमलं नाही तर कुस्ती…दानवेंचे अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा गांधी घराण्याला इशारा
विश्व भारत ऑनलाईन : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून गांधी घराण्याला इशारा दिलाय. चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे. राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात …
Read More »पोलिसांचे वेतन दीडपट वाढणार… वाचा सविस्तर
विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडचिरोलीतील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात …
Read More »शिवसेना-धनुष्यबाण वाद : मुख्यमंत्री शिंदेची 130 वकिलांची फौज
विश्व भारत ऑनलाईन : सध्या खरी शिवसेना कोणाची? यावर चांगलाच वाद सुरु आहे. यावर निवडणूक आयोगात जेव्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे. दिग्गज वकील कोण? 130 वकिलांच्या फौजेत …
Read More »
विश्वभारत News Website