Breaking News

Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा गांधी घराण्याला इशारा

विश्व भारत ऑनलाईन : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून गांधी घराण्याला इशारा दिलाय. चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे. राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात …

Read More »

पोलिसांचे वेतन दीडपट वाढणार… वाचा सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडचिरोलीतील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात …

Read More »

शिवसेना-धनुष्यबाण वाद : मुख्यमंत्री शिंदेची 130 वकिलांची फौज

विश्व भारत ऑनलाईन : सध्या खरी शिवसेना कोणाची? यावर चांगलाच वाद सुरु आहे. यावर निवडणूक आयोगात जेव्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे. दिग्गज वकील कोण? 130 वकिलांच्या फौजेत …

Read More »

उद्धव ठाकरेंचे विश्वसनीय मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात?

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी …

Read More »

खुशखबर! सिलेंडर दरात मोठी कपात

विश्व भारत ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 32.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. घरगुती सिलेंडर आहे त्याच दराने उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या …

Read More »

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल… वाचा काय आहे प्रकरण…

  विश्व भारत ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, असे विधान केले होते. त्यानंतर आता छगन भुजबळ आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम …

Read More »

टेन्शन वाढलंय! वर्षभरात 15 एलपीजी सिलिंडर मिळतील… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : आता घरगुती एलपीजी ग्राहकांना नवीन नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळतील. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. …

Read More »

मोफत रेशन सुरुच राहणार, PMGKAY योजनेला मुदतवाढ

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील ३ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे गरजूंना पुढील तीन महिने मोफत रेशन मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. कोरोना काळात २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो धान्य मोफत मिळते. मार्च …

Read More »

शिंदे × ठाकरे : बहुमत सिद्ध करणाऱ्याची शिवसेना

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात धाव घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बाजू मांडण्यास सांगितलं होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शपथपत्र लिहून घेण्याचा कार्यक्रम रावबला. दुसरीकडे इतर राज्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही केले जात आहे. शिंदे-ठाकरेंचे …

Read More »