विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? …
Read More »दिवाळीत सरसकट फटाक्यांवर बंदी ? याचिका फेटाळली
विश्व भारत ऑनलाईन : फटाक्यांवर बंदी घालण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. फटाक्यांवरील बंदीच्या याचिकेचा उल्लेख समोर आल्यावर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याने लवकर न्यायालयात दाद मागायला पाहिजेत होती. ज्यांनी फटाक्यांच्या उद्योगात आधीच गुंतवणूक केली आहे; त्यांचे येत्या दिवाळीत नुकसान होईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणीस नकार दिला. …
Read More »चिन्ह मिळाले : ‘धगधगत्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर
विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आले आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन …
Read More »आईवडिलांना सांभाळण्यास नकार देणाऱ्या मुलांची संपत्ती परत घेता येईल – हायकोर्ट
विश्व भारत ऑनलाईन : मुलांना संपत्ती हस्तांतरित करताना आईवडिलांना वृद्धापकाळात मूलभूत सुविधा, शारीरिक काळजी न घेतल्यास आईवडील संपत्ती हस्तांरित करण्याचा करार रद्द करू शकतात, असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. कायद्यातील तरतुद २३ नुसार हा निकाल देण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात भारतीय वायुदलातील निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने मुलाविरोधात ही याचिका दाखल केली होती. या निकालात संबंधित …
Read More »गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली
विश्व भारत ऑनलाईन : गाईला केंद्र सरकारने राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावेळी खंडपीठाने गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी निर्देश देण्याचे हे काम न्यायालयाचे आहे का? जिथे आम्हाला वेळ खर्च करावा लागतो. तुमच्या कोणत्या मूलभूत अधिकारांवर परिणाम झाला आहे, तुम्ही कशासाठी न्यायालयात आला आहात? असे सवाल करित यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्या गोवंश …
Read More »ठाकरे आणि शिंदेंना धक्का, धनुष्यबाण चिन्ह गोठवले… पण…
विश्व भारत ऑनलाईन : ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय? दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे …
Read More »यवतमाळ-मुंबई बसला आग : नाशिकमधील घटना : चिमकुल्यासह 12 जणांचा बळी
विश्व भारत ऑनलाईन : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू …
Read More »निवडणूक आयोगाचे ठाकरेंना पत्र, उद्या दुपारी 2 पर्यंत उत्तर द्या
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे …
Read More »आमदार, खासदारांची संख्या ठरविणार धनुष्यबाण कुणाचे? शिंदेंचं पारडं जड?
विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण कुणाचा, शिंदे की ठाकरे यावर आजच फैसला अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते. एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप. आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्तवाचं ठरतं. तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या …
Read More »ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनेही मनावर घेतल्याचे समजते. या निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. …
Read More »