Breaking News

Breaking News

मासेमारीला गेलेल्या व्यक्तीचा तलावात मृत्यू

चंद्रपूर : सावली तालुक्यातील केरोडा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापू राऊत (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. केरोडा येथील सुखदेव राऊत हे तीस वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोसायटीच्या वतीने केरोडा गावातीलच तलावात मासेमारी करण्यात आली. संस्थेतंर्गत असलेल्या काही गावातील मत्स्य व्यवसायिक केरोडा …

Read More »

परफ्यूमपेक्षाही उत्तम : आंघोळ करताना करा ‘या’ गोष्टींचा वापर

मानसिक स्वच्छतेबरोबरच शारीरिक स्वच्छता आवश्यक आहे. आंघोळ नियमित केल्याने शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. तसेच आजार दूर राहतात. मात्र, काही वेळा आंघोळ केल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतरही काहींच्या अंगातून दुर्गंधी येते. फ्रेश वाटावं यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळव्यात हे सांगणार आहोत, तुम्हाला साहजिकच दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि परफ्युमची गरजही संपेल. …

Read More »

LPG सिलेंडर झाले स्वस्त : पण…

नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईसंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. नवीन दर काय? – मुंबईत पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत …

Read More »

भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते. खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’ मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी …

Read More »

“दारू पिता का?” कृषी मंत्री सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं ; प्रचंड संताप

विश्व भारत ऑनलाईन : व्हिडीओ बघा👇👇👇 अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराबकिसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराबएक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करोहुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022 राज्याचे कृषीमंत्री …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन

विश्व भारत ऑनलाईन : जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं …

Read More »

मुंबईला बॉम्बने उडविण्याची धमकी

विश्व भारत ऑनलाईन : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन हेल्पलाइन नंबर 112 वर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. टार्गेटचे ठिकाण मुंबईतील इनफिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल सांताक्रुझ हे बॉम्बने उडविणार असल्याचा दावा या निनामी फोनमध्ये करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक …

Read More »

पुन्हा नागपुरात गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांना धक्का, जिल्हा परिषदेत काँग्रेसने मारली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बाजी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने गड कायम राखला आहे. काँग्रेसच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील मुक्ता कोकरड़े नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष (मत प्राप्त 39) आणि काँग्रेसच्याच गोधणी येथील कुंदा राउत (मत प्राप्त 38)यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. तर,भाजपच्या मदतीने उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांना केवळ 15 मत मिळाली. त्यामुळे भाजपच्या नियोजनाला …

Read More »

महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पीएम किसान सन्मानचा बारावा हफ्ता सोमवारी बँक खात्यात

विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट मोदी सरकारने दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असून, सोमवारी दिला जाणारा हप्ता हा बारावा राहणार आहे. देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अर्थात डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक …

Read More »