Breaking News

Breaking News

आयएएस अधिकाऱ्याकडून सहकाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या : कारवाईची मागणी

बिहारमधील एका आयएएस अधिकाऱ्याने सहकर्मचाऱ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. त्याबद्दलचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यावर बिहारच्या भाजप प्रवक्त्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय. त्या अधिकाऱ्याला काढून टाकावे, असेही त्यांनी म्हटले. बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याचा शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सध्या वातावरण तापलं आहे. त्या व्हिडिओत आयएएस अधिकारी के. के. पाठक यांनी बिहारच्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले. सहकर्मचाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. एका संघटनेच्या …

Read More »

जीवन क्षणभंगूर : कार चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका

स्वतःच्या चारचाकी वाहनाने एकटेच बुलढाणा, जळगाव जामोदकडे निघाले असता वाटेतच हृदयघातरुपी काळाने ‘त्यांना’ गाठले.दुखणे असह्य असतानाही त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांना ही बाब कळविली. मात्र, कुणीही मदतीला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू एखाद्याला कसा खिंडीत गाठतो, याचे हे हृदयद्रावक उदाहरण. सोमवारी सकाळी स्थानिक महात्मा फुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मानकर (६५) आपल्या मोटारीने जळगाव जामोदकडे जात होते. …

Read More »

नागपुरातील कळमना बाजारात आग

नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More »

बैल चारत असताना वाघाचा हल्ला : शेतकरी ठार

बैल चारत असताना वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली. सुधाकर भोयर (वय ५० रा.राजगाटा चेक) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भोयर हे आज बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते …

Read More »

मासेमारीला गेलेल्या व्यक्तीचा तलावात मृत्यू

चंद्रपूर : सावली तालुक्यातील केरोडा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापू राऊत (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. केरोडा येथील सुखदेव राऊत हे तीस वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोसायटीच्या वतीने केरोडा गावातीलच तलावात मासेमारी करण्यात आली. संस्थेतंर्गत असलेल्या काही गावातील मत्स्य व्यवसायिक केरोडा …

Read More »

परफ्यूमपेक्षाही उत्तम : आंघोळ करताना करा ‘या’ गोष्टींचा वापर

मानसिक स्वच्छतेबरोबरच शारीरिक स्वच्छता आवश्यक आहे. आंघोळ नियमित केल्याने शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. तसेच आजार दूर राहतात. मात्र, काही वेळा आंघोळ केल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतरही काहींच्या अंगातून दुर्गंधी येते. फ्रेश वाटावं यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळव्यात हे सांगणार आहोत, तुम्हाला साहजिकच दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि परफ्युमची गरजही संपेल. …

Read More »

LPG सिलेंडर झाले स्वस्त : पण…

नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईसंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. नवीन दर काय? – मुंबईत पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत …

Read More »

भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते. खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’ मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी …

Read More »

“दारू पिता का?” कृषी मंत्री सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं ; प्रचंड संताप

विश्व भारत ऑनलाईन : व्हिडीओ बघा👇👇👇 अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराबकिसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराबएक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करोहुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022 राज्याचे कृषीमंत्री …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन

विश्व भारत ऑनलाईन : जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं …

Read More »