विश्व भारत ऑनलाईन : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू …
Read More »निवडणूक आयोगाचे ठाकरेंना पत्र, उद्या दुपारी 2 पर्यंत उत्तर द्या
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे …
Read More »आमदार, खासदारांची संख्या ठरविणार धनुष्यबाण कुणाचे? शिंदेंचं पारडं जड?
विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण कुणाचा, शिंदे की ठाकरे यावर आजच फैसला अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते. एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप. आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्तवाचं ठरतं. तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या …
Read More »ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनेही मनावर घेतल्याचे समजते. या निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. …
Read More »ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …
Read More »शिंदे गटाचा आमदार भाजपच्या कार्यक्रमात, फडणवीस यांची स्तुती
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे. भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे …
Read More »भंडारा : धान घोटाळा करणाऱ्यावर कारवाई-फडणवीस
विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक …
Read More »7 हजार एसटी वाढणार, डिझेलऐवजी विद्युत, सीएनजी बस
विश्व भारत ऑनलाईन : प्रवासदर्जा उंचावण्यासाठी एसटी महामंडळाने सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळ नफ्यात आणण्याकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एसटी पुनरुज्जीवन आराखड्या’ची अंमलबजावणी सुरू केलीय. खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील गाड्यांवर भर आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवण्यासाठी विद्युत, सीएनजी गाड्यांचा यात समावेश आहे. चार वर्षांत टप्याटप्याने सात हजार गाड्या घेत एसटी ताफा २२ हजारापार नेण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे. असे नियोजन …
Read More »नाशिक : सप्तश्रुंगी गडावर पाच लाख भाविक अडकले
विश्व भारत ऑनलाईन : नाशिकच्या जगप्रसिद्ध सप्तशृंगी गडावर सध्या जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांची गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावातच रोखून ठेवलं आहे. तर, यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. खरंतर सध्या नवरात्र सुरु आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी जमणं हे साहजिकच आहे. पण आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणारा अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय वाघमारे असे त्याचे नाव आहे. तर, हॉटेलचे बील द्यायचे नव्हते त्यामुळे त्याने बनाव केल्याचा दावा केल्याचे कळते. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …
Read More »
विश्वभारत News Website