विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …
Read More »निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …
Read More »तावडेंकडे बिहार,जावडेकरांकडे केरळचा अवघड पेपर, मुंडेकडेही जबाबदारी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. तर,पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …
Read More »राष्ट्रवादीला धक्का, आव्हाड कारणीभूत?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दोन दिवसांपूर्वीचं पक्षाचा राजीनामा दिला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे,असा आरोप गावडेंनी पक्षांतर करताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ते प्रवेश करणार आहेत. काय कारण? जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे अधिकारी वैतागले
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात मुख्यमंत्री रात्री उशीरापर्यंत बैठका आणि कामकाज करत असल्याने एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि …
Read More »थेट सरपंचपदासह १,१६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ …
Read More »सरपंच, उपसरपंच मानधनाविना
मुंबई : सरपंच, उपसरपंचांना मानधनासाठी करावी लागणारी भटकंती कायम आहे. त्यामुळे राज्यातील सरपंच, उपसरपंचांसाठी मानधन हे मृगजळ ठरले आहे. राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक गावातील सरपंच, उपसरपंचांमध्ये नाराजी आहे. सरपंच-उपसरपंचांचे मानधन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान संस्थेकडे सोपवली होती. यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना (डेटा ऑपरेटर) मानधनविषयक माहिती संकलनाची जबाबदारी देण्यात आली. हे संकलन दरमहा करायची अट घालण्यात आली. त्यासंदर्भातील माहिती कधी …
Read More »सप्टेंबर अखेर राज्यात निवडणूक
– मोहन कारेमोरे नागपूर : महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीवरील प्रशासकाची मुदत 15 सप्टेंबरनंतर संपुष्टात येईल. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु होईल.राज्यातील १८ महापालिका, १६४ नगरपरिषदा, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. १५ सप्टेंबरनंतर प्रशासकाला सहा महिने पूर्ण होत आहेत. राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने …
Read More »ज्योतिरादित्यचे अशोक चव्हाणसाठी प्रयत्न
मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांंना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली.याची सूत्रे थेट दिल्लीतून हलवली जात आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यात प्रमुख भूमिका बजावत आहेत. शिंदे यांनी प्रारंभिक बोलणी केल्यावरच पुढील पावले पडत आहेत, असेही बोलले जात आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता येणे कठीण झाले आहे. चव्हाण यांना आता …
Read More »काँग्रेसचे आमदार जाणार भाजपात! फडणवीस-चव्हाण यांची भेट
मोहन कारेमोरे मुंबई : सेनेपाठोपाठ आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी …
Read More »